अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीयं.
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात बंडखोरी झाली असून इतर 4 मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.
भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज माघे घ्या अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, या शब्दांत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधलायं.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी धनगर बांधवांना दिला आहे.
चिंचवड मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. भेटीत अजितदादांनी मतदारसंघाची माहिती घेतली असल्याचं नाना काटेंनी स्पष्ट केलं.