सिरियामध्ये राष्ट्रपती बशर असद यांची राजवट संपल्यानंतर आता नव्या राज्यकर्त्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र दिसून येत आहे.
वन नेशन वन इलेक्शनचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला नाही, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केलायं.
1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत मंदिर-मशीदशी संबंधित कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नसल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
रत्नागिरीच्या एमआयडीसी भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलं तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल, असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदेंनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी येत्या 20 जानेवारीला पार पडणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.
संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून निदर्शने करण्यात आली आहेत.
परभणी संविधान विटंबनेप्रकरणी आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा, असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महानिरीक्षकांना फोनद्वारे केलंय.
परभणीत संविधानाची विटंबना झालीयं, हे दुर्देवी असून निषेधार्ह आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी असल्याचं आवाहन भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केलंय.
गौतम सहकारी बँकेला राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिलीयं.