Radhakrishna Vikhe : शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केल्यानंतर जिल्हा विभाजनाची मागणी पुढे आली आहे. जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर (Shrirampur) मुख्यालय करण्याची मागणी आहे. या मागणीसाठी शनिवारी श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. त्यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. त्यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण […]
Fathers Day: प्रत्येक आई-वडिलांचं आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असतं यात तीळमात्रही शंका नाही. आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी आणि त्याला एक आदर्श जीवन देण्यासाठी कठोरपणा दाखवण्यात आईवडील हे कधीही मागे राहत नाही. आई जशी ‘दुधावरची साय, लंगड्याचा पाय, वासराची गाय’ असते तसंच मुलांसाठी वडिलांच्या त्यागाची आणि समर्पणाची तुलना कुठेही होऊ शकत नाही. (Washington’s daughter celebrates Father’s […]
Ahmednagar Politics: श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असते. आताही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. घनशाम शेलार (Ghansham Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) रामराम ठोकून आता बीआरएसमध्ये (BRS) मध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून यंदा तिकीट मिळणे अवघड वाटत असल्याने शेलार यांनी हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात आताच्या परिस्थितीनुसार तिरंगी, चौरंगी लढत होण्याची […]
Siddaramaiah : कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपला रोखले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना मोठी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकच्या विजयात मोठा वाटा असलेले व मुख्यमंत्री झालेले सिध्दरामय्या यांना आता काँग्रेसने दुसऱ्या राज्यात सक्रीय केले आहे. सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे महाराष्ट्रात येणार आहेत. ते एक सभा घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांनाही भेटणार आहेत. (karntaka siddaramaiah-sangli-loksabha-meet-sharad-pawar) […]
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Congress: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतांची जुळवणी करावी लागणार आहे. या मतांचे विभाजन झाल्यास काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसतो हे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसले आहे. यासाठी काँग्रेस आता नव्या भिडूच्या शोधत आहे. आमच्याबरोबर काही समविचारी पक्ष येतील, अशा नेत्यांसोबत बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
Ahmednagar Crime: आमदार राम शिंदे (Ram Shinde) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या कार्यकर्त्यांमधील वाद टोकाला गेला आहे. राम शिंदेंचे समर्थक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) व त्यांच्या मुलाला मारहाण झाली आहे. आमदार रोहित पवारांच्या विरोधात फेसबुकवर कमेंट केल्याने मारहाण झाल्याचा आरोप पोटरे यांचा आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात […]
Ghanshyam Shelar: श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये घुसमट होत होती. काही जण पक्षात राहून पक्षाचे नुकसान करत होते. माझ्याविरोधात कुरघोड्या करत होते. पण पक्षामध्ये त्यांनाच महत्त्व […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीमध्ये आमदार रोहित पवारांना आमदार राम शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. ही बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात आली आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापतिपदी शिंदे गटाचे काकासाहेब तापकीर, तर उपसभापतिपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे. (karjat-market-committee-ram-shinde-defect-rohit-pawar) या बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे व पवार गटाचे प्रत्येकी […]
BJP mission loksabha election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व लोकसभा, विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रमुख नेमलेले आहेत. तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राज्यातून भाजपचे 45 खासदार निवडून देण्याचे मिशन आहे. त्यावर नांदेड येथील सभेत अमित शाह यांनी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून देशभरात सरकारी योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दरम्यान जोरदार वादळ आले. या वादळात मंडळ कोसळला. त्यात भाजपचे (Bjp) […]