अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
नाशिकः विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय. नाशिकमधील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आज प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तनुजा या नाशिक पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. […]
अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या जागेवरून तीन वेळेस निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात भाजप तगडा उमेदवार देण्याची चर्चा होती. पण अद्याप भाजपकडून उमेदवार जाहीर झाला नाही. या ठिकाणी भाजपकडून वेगळा चमत्कार केला जाईल, असेही बोलले जात होते. परंतु अद्याप तरी भाजपकडून उमेदवारही जाहीर […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर, कार्यालयांवर ईडीसह आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने […]
मुंबईः राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तारखांसाठी नेते आणि कार्यकर्ते यांची प्रतीक्षा सुरू असतानाच त्या आधीच राज्य सरकारने त्यांना खूश करणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महापालिकेतील एकूण सदस्य संख्येच्या कमाल दहा टक्के किंवा दहा सदस्य (या पैकी जे कमी असेल ते) यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा […]
नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य, केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून शिंदे-फडणवीस सरकार बनवले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे. हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. आमची बाजू न्यायाची आहे. सत्येची आहे. […]
नवी दिल्लीः देशातील क्रमांक एकचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निशाणावर कायमच असतात. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, उद्योगपती अदानींवर टीका केली आहे. त्याला आता अदानी यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. गेल्या आठ वर्षांपासून राहुल गांधी हे तुमच्यावर टीका करत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अदानी […]
मुंबईः प्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीसाठी आपली तयारी असल्याचे संकेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिल्याने कोकणातला राजकीय समीकरण बदलत आहे का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या अभिनंदन अभिवादन या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडलं. याच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित […]
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.
नवी दिल्लीः ब्राझीलमध्ये राजकीय संकट उभे राहिले असून, लोकशाही संकटात आली आहे. माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राजधानीमध्ये आंदोलन केले आहे. आंदोलन करणाऱ्यांनी संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टामध्ये घुसखोरी केलीय. नवीन राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डा सिल्वा यांना बोल्सोनारो समर्थकांनी विरोध दर्शविला आहे. येथील परिस्थितीवरून जगभरातील राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. आंदोलक हे रस्त्यावर […]
नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता १० जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबर महिन्यामध्ये दोनदा लांबणीवर पडली होती. तर डिसेंबर महिन्यात हिवाळी सुट्टी असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होऊ शकले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ठाकरे गट व शिंदे गटाकडून विविध याचिका दाखल आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड […]