अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबईः येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व आमच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा होत आहे. शिवसेनेला वंचितबरोबर आघाडी करायची आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांना शिवसेनेला एकत्र घ्यायचे आहे. पण राष्ट्रवादीचा आम्हाला खुला विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. गरीब मराठा सत्तेमध्ये येऊ नये, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. […]
पुणेः भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. […]
औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अर्ध्याहून आमदार हे भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच केला होता. त्यानंतर आता भाजपकडून वेगळीच राजकीय खेळी केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दाव्यावरून उघडकीस आले आहे. मराठवाड्यातील लोकसभेचे आठही उमेदवार भाजप चिन्हावर विजयी होतील, असा दावा सावे यांनी केलाय. भाजपने राज्यातील महत्त्वाच्या जागांवर […]
नवी दिल्लीः सरकारच्या नोटबंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सोमवारी हा निकाल दिला आहे. पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटबंदीच्या प्रक्रियेत काहीच गोंधळ झालेला नाही. हा निर्णय बदलू शकत नाही, असे न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे. चार न्यायाधीशांनी नोटबंदीच्या बाजूने निर्णय दिलाय. तर एका न्यायाधीशांनी नोटबंदी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती एस अब्दुल […]
मुंबईः खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका केली. तर शिंदे गटातील काही जणांमध्ये असलेल्या वादावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार भाजपात स्वतःला विलीन करून घेतील व हेच त्यांचे ध्येय असल्याचा दावाही त्यांनी केलाय. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर राऊत म्हणाले, आत्मपरीक्षण […]
अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत शिंदे-भाजप सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने नगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवण्यात आल्याने अहमदनगर महापालिकेतील अधिकारी गोंधळून गेले […]
पुणेः भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची 100 एकर जमीन सरकारने संपादित करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. आपण राज्य आणि केंद्र सरकार तसेच समाजाच्या वतीने येथे अभिवादनास उपस्थित राहिलो असल्याचे आठवले म्हणाले. ऐतिहासिक विजय स्तंभ […]
औरंगाबादः हिवाळी अधिवेशनात गायरान जमिनीच्या प्रकरणातून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना विरोधकांनी घेरले होते. अधिवेशन संपल्यानंतर सत्तारांनी माझ्याविरोधात शिंदे गटातील जवळचे नेते अडचणीत आणत असल्याचे गौप्यस्फोट केला होता. तर सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात एक अडचण आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेला येणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिक हे कार्यक्रमस्थळाहून निघून जात होते. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हे […]
पुणेः पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाण्याचे टाळले आहे. चंद्रकांत पाटील यांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. तसेच एक पत्र त्यांनी ट्वीट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय?, छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. परंतु तिथे काही जण गोंधळ घालून दंगल करतील. अनुयायांचा […]
कोल्हापूरः माझ्या पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. त्यामुळे शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनेकवेळी ते गंमतीने बोलतात. त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे मला माहिती नाही, असे केसरकर म्हणाले. हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर […]