अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात (Uttarkashi Tunnel ) गेल्या 16 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. परदेशी कंपन्या, सैन्य दलाची मदत घेण्यात आली आहे. या बोगदा दुर्घटनेप्रकरणात आता अदानी समुहाला काही जणांनी ओढले आहे. हा बोगदा अदानी समुहाकडून उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता […]
Nana Patole On Shinde Committee मुंबईः आरक्षणावरून (Maratha Rerervation) मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात पेटला आहे. आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती शिंदेवर आक्षेप घेतला आहे. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उडी घेत भुजबळांच्या विधानाला समर्थन दर्शविले आहे. सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्रीच या समितीवर जाहीरपणे आक्षेप घेतायत. […]
T20 Series : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने (India) ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव केलाय. याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत (T20 Series) भारतीय संघाने 2-0 ने आघाडी घेतलीय. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबर गोलंदाजांनी शानदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलिया संघ 9 बाद 191 धावा करू शकल्याने हा सामना भारताने 44 धावांनी जिंकला […]
Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागाला रविवारी अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, नाशिक, नगर, सातारा या जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. हवामाने विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा अंदाज दिला होता. रविवारी दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली […]
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व पावसाचे अनोखे नाते आहे. शरद पवार हे पावसात भिजल्यानंतर विरोधकांना राजकीय धडकी भरते. त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना वेगळी ऊर्जा मिळते. रविवारी पुन्हा एकदा शरद पवार हे पावसात भिजले आहेत. नवी मुंबईतील नेरुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व महिला बचत गट मेळावा झाला. […]
कोचीन: कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या टेक-फेस्टमध्ये ( Cochin University of Science And Technology) शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. निखिता गांधीच्या (Nikhita Gandhi) यांच्या गाण्याच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. त्यातील काही जण हे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी […]
Jitendra Awhad on Sunil Tatkare मुंबईः राष्ट्रवादी पक्ष (NCP) व चिन्ह कुणाचे यावर भारत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावर अजित पवार गट व शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कोणत्याही कारवाईची मागणी करणार नाही, असे विधान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) […]
Raju Shetti on Sadabhu Khot सांगली : ऊसदरावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. ऊस उत्पादकांना पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती. पण शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांच्यावर केला होता. त्याला आता […]
पुणेः संसारात पती-पत्नीचे वाद होतात. त्यात अनेकदा पतीकडून पत्नीला मारहाण करण्याची घटना घडते. परंतु पुण्यात एक वेगळीच घटना घडली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाला (Construction Business) आपल्या जीवाला मुकावे लागलेय. पुण्यातील (Pune) वानवडी भागात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून मृत्यूचे कारणही समोर आले आहे. NCP […]
Bacchu kadu On Mahadev Jankar : पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये एकाकी पडल्या आहेत. पण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मात्र पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहेत. त्यासाठी महादेव जानकर हे भाजपच्या नेत्यांनाही अंगावर घेत आहेत. त्यात आता महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेताना एक मोठे विधान केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे […]