Ahmednagar Lok Sabha : पारनेरमधील कमी मतदानामुळे धाकधूक वाढली, नगर शहरात उशीरापर्यंत रांगा

  • Written By: Published:
Ahmednagar Lok Sabha : पारनेरमधील कमी मतदानामुळे धाकधूक वाढली, नगर शहरात उशीरापर्यंत रांगा

Ahmednagar Lok Sabha Low Voting: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघांमध्ये (Ahmednagar Lok Sabha) पाच वाजेपर्यंत सरासरी 53 टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. नगर शहरात अनेक मतदान केंद्रांवर उशीरा सहानंतर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु पारनेर विधानसभा मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. या मतदारसंघातून नीलेश लंके (Nilesh lanke) हे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे येथे जास्तीत जास्त मतदान होईल, असे वाटत होते. पण इतर विधानसभा मतदारसंघापैकी पारनेरला मतदान कमी झाले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेवारी काहीशी कमी राहिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नीलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) या दोन्ही उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.


राहुल गांधींवर घणाघात अन् नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक,फडणवीसांची मुरबाडमध्ये सभा

तर दुसरीकडे शेवगाव आणि नगर शहारामध्ये मतदारांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे देखील दिसून आले. राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर दक्षिणेमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या थेट सामना झाला. आपल्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी जावी यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी नगरमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर आज मतदान प्रक्रिया पार पडली.

PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक; शाहांनी एकेक मुद्दा केला क्लिअर


कर्जत-जामखेडला सर्वाधिक मतदान

सायंकाळी वाजेपर्यंतच्या आलेल्या आकडेवारीनुसार सरासारी 53% मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात झाले आहे. येथे 57.20% तर त्या खालोखाल राहुरी येथे 56.64, नगर शहर 54.50, शेवगाव 54.18, श्रीगोंदा 51.24, कमी मतदान पारनेर तालुक्यात झाले असून 46.60% एवढेच मतदान झाले. दरम्यान मतदानाची अंतिम आकडेवारी ही उशिरा रात्रीपर्यंत जाहीर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्यापूर्वीच दक्षिणेतील श्रीगोंदा व पारनेर या दोन तालुक्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube