सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) एबी फॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंतही यश आलेले नाही. त्यामुळे त्यांना अपक्षच लढावे लागणार आहे. विशाल यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी काँग्रेस पक्षाशी नामसाधर्म्य असलेल्या भारतीय विकास काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पर्यायाचाही विचार केला होता. पण त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय […]
गत लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 25जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 23 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. दोन ठिकाणी पराभव झाला. पहिला बारामतीमध्ये. तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या (BJP) कांचन कुल (Kanchan Kul) यांचा पराभव केला. तसं बारामती हा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला होता. त्यामुळे येथील पराभवाचा भाजपला धक्का बसला नाही. भाजपला दुसऱ्या […]
पुणे : प्रचाराची धामधुम सुरु असतानाच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज असलेले पुण्याचे माजी उपमहापौर, आणि सहा टर्मचे माजी नगरसेवक आबा बागुल (Aaba Bagul) भाजपच्या वाटेवर आहेत. आज (15 एप्रिल) नागपूरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यांच्या भेटीसाठी गेले […]
सांगली जिल्ह्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांना भले भले घाबरुन असतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या कामाचा पसारा राज्यभर आहे. पण म्हणून त्यांनी सांगली जिल्ह्यातील स्वतःचा होल्ड थोडाही कमी होऊ दिलेला नाही. त्यांच्या ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायच्या’ स्टाईलचा धसका अनेकांना झोपू देत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून (Congress) […]
2014 ची विधानसभा निवडणूक. शिवसेनेनं त्यावर्षी 63 आमदार निवडून आणले होते. पण सेनेनं सगळ्यात खराब कामगिरी कुठं केली असेल तर ती विदर्भात. रामटेक वगळता बहुतांश मतदारसंघात शिवसेनेच्या (Shivsena) सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. यातच एक होता साकोली मतदारसंघ. तिथं शिवसेना उमेदवाराला अवघी दीड हजार मत मिळाली होती. त्यामुळे त्यांचंही डिपॉझिट जप्त झालं होतं. बरोबर […]
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) काँग्रेसचा (Congress) गेम केल्याचा आरोप झाला. ज्या ज्या मतदारसंघात असं चित्र होतं त्यापैकी एक होता राज्याच्या शेवटच्या टोकाचा गडचिरोली-चिमूर मतदारसंघ. भाजपच्या (BJP) अशोक नेते (Ashok Nete) यांचा 77 हजार मतांनी विजय झाला होता. अशोक नेते यांना पाच लाख 19 हजार मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या […]
1999 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच जाहीर झाली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अगदीच नवीन होता. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी तयार होत होती. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारही शोधावे लागत होते. असाच एक मतदारसंघ होता साताऱ्यातील जावळीचा. डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग असलेला,’जावळीचं खोरं’ म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ […]
सांगली लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस (Congress) आणि ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) यांच्यात तुंबळ युद्धच चालू आहे. ही जागा ठाकरेंकडून परत काँग्रेसकडे (Congress) घेण्यासाठी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असे जिल्ह्यातील एकापेक्षा एक नेते मुंबई आणि दिल्लीत वणवण फिरले. इकडे राज्यात पृथ्वीराज चव्हाण (Prthviraj Chavan), नाना पटोले, बाळासाहेब थोरात […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार आहोत. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केली. आज विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासमवेत जिल्हा […]
नागपूर : रामटेकचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला जाताना आज (10 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्हान जवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात […]