सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस थांबला आहात. उद्यापर्यंत वाट बघा. पण सांगलीमधून काँग्रेसच (Congress) लढणार असे म्हणत इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ठणकावले. सांगलीतील काँग्रेस […]
माढा : माढ्यातून मोहिते पाटील घराणे भाजपची साथ सोडणार आणि धैर्यशिल मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गुढीपाडव्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात पक्षप्रवेश होणार आहे. याच पार्श्वभूमीवर माढ्याची जागा भाजपकडे (BJP) कायम राखण्यासाठी आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांचा विजय निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
अखेर नाही, होय म्हणत कल्याणमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्यामुळे ‘श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून (Kalyan Lok Sabha) लढणार की ठाण्यातून लढणार, कल्याणमधून भाजपचा उमेदवार असणार’ या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण ही उमेदवारी ना शिवसेनेने (Shivsena) जाहीर केली, ना शिवसेनेच्या कोणत्या प्रमुख नेत्याने जाहीर केली ना […]
सातारा : अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या गुढीपाडव्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha) धैर्यशिल मोहिते पाटील […]
“आमच्यासोबत आलेला एकही पराभूत होणार नाही… झालो तर राजकारण सोडून शेती करायला निघून जाईन…” हे वाक्य होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे. 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या आभाराच्या भाषणात शिंदे यांनी हे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर लोकसभेची (Lok Sabha Election) ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे अनेकांच्या नजरा एकनाथ शिंदे काय करणार […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे (Bhiwandi Lok Sabha) उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatra) यांच्या गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे. येवई येथील आर. के. लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीएने छापे टाकले आहेत. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हणत ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) आणि बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता […]
पंकजा मुंडे, महादेव जानकर अन् छगन भुजबळ… भाजपच्या (BJP) सुप्रसिद्ध अशा माधव (Madhav) पॅटर्नचे प्रमुख तीन चेहरे. यातील पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि जानकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार आहे. 2019 मध्ये भाजपने ‘माधव’ पॅटर्नला फारसे महत्व दिले नव्हते. यंदा मात्र भाजपने पुन्हा एकदा माधव पॅटर्नला सिरीयस घेतले आहे. […]
रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सगळ्यात मोठा फटका कुठे बसला तर तो खान्देशात. त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनावणे अशा एका-दोघांनी नाही तब्बल पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. सर्व जण शिंदेंच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या दोन वर्षांच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथे […]
7 मार्च 2016 ची दुपार… शिवसेनेचे तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या मातोश्रीवर बंगल्यावर एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. त्यासाठी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे सर्वजण उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष सुरु होता. ठाकरे आले आणि ज्यांचा पक्षप्रवेश पार पडणार […]