केंद्राने बंदी मागे घेताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. यामुळे शेतकर्यांना निर्यात बंदी मागे घेतल्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जाते.
सांगलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत एक मेळावा पार पडला.
संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा सांगलीत पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.
महाराष्ट्रात पाचही टप्प्यातील मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पंकजा मुंडे यांनी आपल्याकडे एकूण 46 कोटी 11 लाखांची संपत्ती अससल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे. .
कोल्हापूर : काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या बाजीराव खाडे (Bajirao Patil) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. खाडे काँग्रेसचे (Congress) माजी सचिव आहेत. ते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने ऐनवेळी शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी दिल्याने खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. […]
राजापूर : आज मी जो काही आहे, तो केवळ दादांमुळे. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळेच माझी पत्नी हिंदुजामध्ये ऍडमिट असतानाही इथे आलो आहे, मी विकासासाठी नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबरोबर राहणार आहे, अशा शब्दात राजापूरचे शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार आणि सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेल्या गणपत कदम यांनी भाजपचे (BJP) रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण […]
नवी दिल्ली : देशातील कोणत्याही निवडणुका कधीच बॅलेट पेपरवर होणार नाहीत, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये काही सुधारणा करता येतील. पण आता निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होणार, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ही मागणी फेटाळून लावली. आज (24 एप्रिल) ईव्हीएम मशीनसंबंधीत सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. (Supreme Court has decided that elections will […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कधीही वादात अडकणार वक्तव्य केलं असं ऐकीवात नाही. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागं विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असतं. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मोदींनी दोन दिवसांपूर्वी केलेलं संपत्ती आणि मंगळसुत्राबद्दलच वक्तव्यही असंच अगदी विचारपूर्वक केलं आहे. त्यांनी थेट भारतातील महिला मतदारांच्या काळजाला […]
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की कोणत्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची. भाजपसाठी (BJP) एक एक जागा किती महत्वाची असते, त्या जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजप ग्राऊंड लेव्हलला जाऊन काय काय करु शकते या गोष्टींचा अनुभव आपल्याला यापूर्वी अनेकदा आलेला आहे. असाच अनुभव आता दक्षिण मुंबईच्या जागेसाठी येत आहे. सेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्याकडे घेत भाजपने […]