कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
National Crime Records Bureau Report 2022 : पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आता देशात दंगलीच्या (Riot) बाबतीत अव्वल असल्याचं समोर आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) च्या अहवालानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलीचे 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात पॉक्सो गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून […]
Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban on export of onion) घालून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हेरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे स्वतः आज मैदानात उतरले असून त्यांनी केंद्र सरकावर कांदा निर्यातीवर जोरदार टीकास्त्र डागलं. कांदा उत्पादक शेतकरी वर्गाविषयी केंद्र सरकारला आस्था नाही, अशा […]
मुंबई : ऊस उत्पादनात घट झाल्याने देशातील साखरेचे उत्पादनही घटले आहे. त्यामुळे साखरेच्या दरातही वाढ झाली आहे. हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी (Ban on ethanol production) घातली आहे. याशिवाय केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion export ban) केली आहे. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. दरम्यान, […]
Tiger 3 : टायगर 3 (Tiger 3) या YRF स्पाय युनिव्हर्सने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातला पण प्रेक्षकांचं अनोखं प्रेम मिळवत हा चित्रपट ब्लॉकबस्टर हीट ठरला. सलमान खान(Salman Khan), कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला त्याच्या अॅक्शन सीक्वेन्स, दमदार गाणी संगीत आणि कलाकारांच्या अभिनयासाठी कौतुक आणि तितकीच प्रशंसा […]
Shiv Sena MLA disqualification hearing : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात(Shiv Sena MLA disqualification) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे गटाच्या प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली. यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची सुनावणी सुरू झाली आहे. […]
INDIA Allience Meeting : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या इंडिया (INDIA Allience) आघाडीच्या बैठकीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच बैठक आहे. ‘सरकार पडणार’ […]
Manoj Jarange on Devendra Fadanvis : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ले करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या जरांगे पाटलांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे टीकेचा मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ […]
CIDCO Recruitment 2024 : अनेक जण नोकरीच्या शोधात आहे. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं महाकठीण काम आहे. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अर्थात सिडको येथे काही पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत लेखा […]
Nashik Train Accident : देशात सातत्याने रेल्वे अपघाताच्या (train accident) घटना घडत आहेत. आताही आणखी एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळं कसारा-इगतपुरी आणि नाशिककडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत. मात्र, या […]
Nitesh Rane On Manoj Jarange : सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली होती. शिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका झाली. आताही […]