कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Rohit Pawar : सध्या राज्यात आरोग्य, बेरोजगारी, महागाई असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अनेक वर्षापासून सार्वजनिक आरोग्य धोरण निर्माते आणि डॉक्टर आणखी काही रुग्णालये स्थापन करण्याची गरज व्यक्त करत आहे. मात्र, राज्यात पुरेशा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा नाहीत. अशातच राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची (Ministry of Health) एक जाहीरात […]
अहमदनगर – दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चोरीच्या आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगावमध्ये चोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतांनाच आता याच घटनेची पुनरावृत्ती श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करत घरातून लाखो रुपयांची […]
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Mumbai-Pune Expressway) तयार करताना पुढील 25 वर्षांचा विचार करण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग वाहतूक कोंडी आणि वारंवार अपघातांच्या चक्रात अडकला आहे. या महामार्गाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच ‘MSRDC’ ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रोडवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महामार्गावर […]
Chandrasekhar Bawankule on Congress : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ला (Women’s reservation bill) आज लोकसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. आता हे विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाणार आहे. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान याच विधेयकावरून आता […]
Dr. Fauzia Khan on Women’s reservation bill : केंद्र सरकारने मांडलेले ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ (Women’s reservation bill ) आज लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, नारी शक्ती वंदन विधेयकावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान […]
Dharmarao Baba Atram : काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून त्यांना धमकी देण्यात आली आहे. सूरजागड येथील लोहखाणीला (Surjagad Iron Mine) धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून ही धमकी देण्यात आली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. सुरजागड येथे […]
Women’s reservation bill passed in Lok Sabha : केंद्र सरकारने मांडलेलं ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ लोकसभेत आज मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. आता हे विधेयक उद्या गुरुवारी राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. जर हे विधेयक राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर झाले तर ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर […]
India-Canada Tension: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचा कट भारताने रचला असल्याचा सनसनाटी आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे.. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधात कटूता निर्माण झाली. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, आता कॅनडातील ‘सिख फॉर […]
Sonia Gandhi on Womens Reservation Bill : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) मंजुरीसाठी संसदेत ठेवलं आहे. त्यामुळे राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राजकारणात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढावा आणि स्त्री-पुरुषांमधील दरी कमी व्हावी, या उद्देशाने हे विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी […]
Mumbai Municipal Corporation Bharti 2023: आज प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी आहे. प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फारच कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक […]