कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Yogesh Gholap met Sharad Pawar : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी निश्चित असल्याचं गृहीत धरून काही दिवसांपासून तयारी करणारे ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीतून उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाल्याने घोलप यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलल्या […]
Zareen Khan arrest warrant : सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांचं मनोरंजन केलं. इतकंच नाही तर सलमानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी दिली. दरम्यान, आता सलमान सोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) अडचणीत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सियालदह कोर्टाने […]
Sandipan Bhumre on Sanjay Raut : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गट असे दोन गट ऩिर्माण झाले. आता या गोष्टीला एक वर्ष उललून गेलं, तरी दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोज दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे यशवंत सेनेचं (Yashwant Sena) उपोषण सुरू आहे. आज या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवार यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर आज दुसरे उपोषणकर्ते सुरेश […]
Sushil Kumar Shinde : सध्या देशात महागाई गगनाला भिडली आहे. ऐन सनासुदीच्या दिवसांत महागाईने कहर केल्यानं नागरिक चांगलेच हैरान झालेत. दरम्यान, या वाढत्या महागाईवर भाष्य करतांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी आपल्या लग्नाचा किस्साच एका कार्यक्रमात ऐकवला. माझं लग्न 1970 मध्ये झाले होते, लग्न केवळ पन्नास रुपयांत झालं होतं. लग्नावर अवाढव्य […]
Eastern Railway Recruitment 2023: भारतीय राज्यांची नोकरी: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. रेल्वेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3115 रिक्त जागा […]
Babanrao Gholap : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात यंदा निवडणुकीच्या तिकिटासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे या मतदार संघाचं नेतृत्व करताहेत. अशातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उबठात प्रवेश केल्याने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) नाराज आहेत. त्यांच्याकडील संपर्कप्रमुख पद काढून घेण्यात आलं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवलीत उपोषण केलं होतं. या उपोषणाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अखेर सरकारनं नमतं घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणाचं आश्वासन जरांगेंना दिल्यानंतर त्यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडले. दरम्यान, आता जरांगेंनी सरसकट आरक्षणाची केलेली […]
कोल्हापूर : राज्य सरकारने 30 एप्रिल 2024 पर्यंत परराज्यात ऊस निर्यात करण्यावर बंदी (Sugarcane export ban) घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर ऊस निर्यात करता येणार नाही, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) चांगलेच संतापले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. […]