- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
स्वातंत्र्यदिनी होणार कारागृहातून मुक्तता, राज्यातील 186 कैद्यांना विशेष माफी
186 prisoners will be released : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील कारागृहात कैदेत असलेल्या विशिष्ट प्रवर्गातील कैद्यांना तीन टप्प्यात विशेष माफी देण्यात येत आहे. आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले असून आता या कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी एकूण 186 कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे. याबाबत सरकारने आदेश पारित केले आहेत. त्यानुसार […]
-
Prithi Shaw : द्विशतक ठोकूनही पृथ्वी शॉ होतो ट्रोल; ‘तू 23 वर्षांचा काका’
Prithi Shaw : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने इंग्लंडच्या काउंटी ग्राऊंडवर आपली दमदार खेळी दाखवली. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी देतांना त्याने केवळ शतकच केले नाही तर दुहेरी शतकात ठोकले. त्याने अवघ्या 153 चेंडूत 244 धावा केल्या. यामध्ये त्याने 28 चौकार आणि 11 षटकार ठोकले. जितकी चर्चा पृथ्वीच्या फलंदाजीची आहे तितकीच जास्त चर्चा त्याच्या शरीराची आहे. […]
-
अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं
Bachchu Kadu on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी राहुल गांधींवर टीका करतांना म्हटले की, कॉंग्रेसने कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) यांना वाऱ्यावर सोडून दिलं. राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या गरीबीची हृदयद्रावक कहाणी संसदेत सांगितली. मात्र त्यानंतर त्यांनी कलावती यांना मदत केली नाही. तर त्यांच्या […]
-
किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआर ईडीने मागवली
Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scams) आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईनंतर आता ईडी देखील त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने त्यांच्यविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी […]
-
प्रसिध्द अभिनेत्री जया प्रदा यांना न्यायालयाचा दणका! 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेमकं कारण काय?
Jaya Prada : प्रसिध्द अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालयाने (Chennai Court) सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चेन्नईतील रायपेटा येथील थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी जया प्रदा यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. (Actress Jaya Prada jailed for 6 months) चेन्नईमध्ये जया प्रदा यांच्या मालकीचे […]
-
‘इंडिया’ नावाच्या वापराविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील एनडीएला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले. देशभरातील 26 विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या नावाला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियाचा अर्थ इंडियन मुजाहिदीन असा काढला. इंडिया नावावरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही […]
-
राहुल गांधी यांची हुजरेगिरी करण्यासाठी संजय राऊत हाजीर; संजय शिरसाट यांची बोचरी टीका
Sanjay Shirsat On Sanjay Raut : भाजपचा (BJP) पराभव करून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली. इंडिया (INDIA) या विरोधकांच्या आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. आता तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबैठकी संदर्भात बोलतांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, पाटण्यात आणि बेंगळूरमध्ये आमची सरकारं होती. त्या बैठका […]
-
‘सर सलामत तो पगडी पचास, पुन्हा असं करू नका’; आव्हाडांचा CM शिंदेंना मैत्रीचा सल्ला
Jitendra Awhad on Eknath Shinde : खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याच्या बातम्या काल प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या दरे गावी जात होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळेच हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत राजभवन येथे लॅंडिग करण्यात आलं. याच घटनेवरून राष्ट्रवादी […]
-
चर्चा मोदींविषयी नाही, मणिपूरविषयी होती, बोलतांना मोदींना भानच नव्हतं; राहुल गांधींची सडकून टीका
Rahul Gandhi :मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदींविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल उत्तर दिले. या उत्तराच्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने गांधी हे नाव चोरलं. विरोधकांची इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले. दरम्यान, आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul […]
-
मोठी दुर्घटना! पोलिसांची कार नदीत पडली, 7 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी
Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात एक अपघाताची मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी झालेल्या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 पोलिस कर्मचाऱ्यासंह अन्य एकाचा मृत्यू झाला. तर या अपघात अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तीसा बैरागढ मार्गावरील तराई पुलाजवळ हा झाल्याची माहिती आहे. (In Himachal Pradesh police van cae […]









