कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बंगळूर : चार वेळा मुख्यमंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा (Yediyurappa) यांनी राजकीय संन्यास (political renunciation) घेतला आहे. कर्नाटक (Karnataka Assembly Election 2023) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येदियुरप्पा नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. दरम्यान, आता त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. कारण, लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय […]
चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापलाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री बाळगली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेबरोबरच भाजपवरही जोरदार हल्लाबोल चढविला जात आहे. काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी तलेट्सअप मराठीशी संवाद […]
पुणे : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने (maharashtra electricity consumer association) महावितरण (Mahavitaran) विरोधात महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra Electricity Regulatory Commission – MERC) वीजदरवाढी संदर्भात धाव घेतली आहे. वीज संघटनेने राज्याच्या वीज नियामक आयोगाने महावितरण विरोधात याचिका दाखल करुन घेतली आहे. सध्या या प्रकरणात सुनावणी सुरु आहे. मात्र, या सुनावणीत कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीने भाग घेतला […]
लंडन : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली. आयकर विभागाने व्हॅलेंटान डे रोजीच बीबीसीवर कारवाईचा बॉम्ब टाकला होता. त्यानंतर तीन दिवसांपासून अधिकाऱ्यांचे पथक बीबीसीच्या कार्यालयात तळ ठोकून होते. बीबीसी कार्यालयावर झालेल्या छापेमारीवरून भारतात विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Govt)सडकून टीका केली होती. त्यानंतर आयकर विभागाच्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन शुक्ला (Former Justice SN Shukla) आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या वतीने असे सांगण्यात आले की, शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा 2.45 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या मिळवली आहे. सीबीआयने सांगितले की, निवृत्त न्यायमूर्ती शुक्ला यांच्यावर उच्च न्यायालयात […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी : प्रफुल्ल साळुंखे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार व्हावी की जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी, यावर सध्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरु आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वादात आता राजकारण्यांनी देखील उडी घेतली आहे. खरंतर नवा आणि जुना अभ्यासक्रम काय, हे आपण समजून घेऊया. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत आता वस्तुनिष्ठ बहुपर्याय पद्धत […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आणि भाजपविषयी मोठं विधान केलंय. पुण्यातील अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधत असताना भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असा दावा करण्यात आला. भाजपसाठी कसब्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे आजारी असलेले खासदार […]
उज्जैन : उज्जैनमध्ये रामकथा सांगण्यासाठी आलेले प्रख्यात हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास (Dr. Kumar Vishwas) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आणि डाव्या विचारसरणीला निरक्षर म्हटले. अर्थसंकल्पावर बोलताना कुमार विश्वास यांनी हे संघावर ही टिप्पणी केली आहे. त्यांचे संघावर केलेली टिप्पणी ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक हसले आणि त्यांनी कुमार विश्वास यांच्या टिप्पणीवर टाळ्या वाजवल्या. उज्जैनच्या […]
पिंपरी चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही पक्षांकडून सभांचा, रॅलींचा धडका सुरू आहे. त्यात संध्याकाळच्या सुमारास महाविकास आघाडीचा प्रचार सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले (Sachin Bhosale) यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार […]
मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांना एका दिवसात हजारो कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (market cap)आज तब्बल ८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. कालच्या पातळीच्या तुलनेत […]