शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज पुन्हा ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही […]
ठाकरे गटाचे ( Thakarey Camp) नेते व ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare ) यांनी शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे. आमच्या शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला देखील करण्यात येत आहे, असा आरोप विचारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. यानंतर राजन विचारे […]
ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिल्याचा धक्कादायक दावा संजय राऊतांनी केलाय. राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र […]
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्यातील वादानंतर आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातून सपना गिलला (Sapna Gill) जामीन मिळाल्यानंतर तिने मुंबई विमानतळ पोलीस स्थानकात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पृथ्वी शॉने चौथ्यांदा सेल्फी देण्यास नकार दिल्यानंतर […]
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला वाळू धोरणाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली होती. आजपासून लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे (State Revenue Council) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत वाळू धोरणाचा मसुदा निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
मुंबई : राज्यभरात विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर (Non Teaching Staff) कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु केले होते. आज हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन तात्पुरते स्थगित केल्यानंतर आजपासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार आहेत. पूर्णपणे सातवा वेतन लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा अंतर्गत आश्वासित […]
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या (MPSC Student Protest) ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यरात्री भेट दिली. यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या योग्यच असून आपण त्यांच्या पाठिशी आहोत, असे म्हणत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत प्रश्न […]
मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत (ShivSena Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक […]
मुंबई : ज्यावेळी शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा वाद सुरु होता, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाचे मुख्य नेते असे संबोधले जायचे. आता शिवसेना त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना पक्ष प्रमुख असे संबोधले जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिली. ज्या प्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेनेची रचना केली होती, त्या प्रकारची […]
मुंबई : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट (Dadasaheb Phalke Award) महोत्सव २०२३ पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत झाला. या सोहळ्यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित (Anushka Motion Pictures) अभिजित दळवी लिखित, दिग्दर्शित ‘कालसर्प’ या लघुपटाला (Kalsarp Short Film) सर्वोत्कृष्ट लघुपटाचा […]