सानिया मिर्झाचा कारकिर्दीतील शेवटचा सामना : पाहा फोटो

दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिप सुरू असून त्यामध्ये भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिची अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजसोबत सहभाग घेतला होता.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत सानिया आणि तिची जोडीदार मॅडिसन कीजला सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

या जोडीचा व्हर्नोकिया कुडेरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांनी 4-6, 0-6 असा पराभव केला.

सानिया मिर्झाने नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि हा तिच्या व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटचा सामना होता.

या सामन्यात सानिया आपल्या खेळाची जादू दाखवून हा सामना जिंकेल अशी सर्वांना अपेक्षा होती.

पण सर्वांचा भ्रमनिराश झाला आणि पहिल्या फेरीतच सानियाला 4-6, 0-6 असा पराभव स्वीकारावा लागला. सानियाचा हा शेवटचा सामना तासभर चालला.

2009 मध्ये सानियाने कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली.

फ्रेंच ओपन 2012 आणि यूएस ओपन 2014 मध्ये मिश्र दुहेरीतही विजेतेपद पटकावले. 2015 मध्ये, सानियाने विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
