opposition unity : मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे संपूर्ण वेळापत्रक इंडिया अलायन्सने (India alliance) जाहीर केले आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर (गुरुवार आणि शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) ग्रँड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) होणार आहे. आज दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून, त्यात बैठकीची माहिती दिली जाणार आहे. वेळापत्रकानुसार 31 […]
BARC Scientist Suicide: चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचे कौतुक करत आहे. तर इकडे मुंबईत (Mumbai) एका शास्त्रज्ञाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील अणुशक्ती नगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) काम करणाऱ्या 50 वर्षीय शास्त्रज्ञाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) ही माहिती दिली आहे. मनीष शर्मा […]
Male dominated culture : वडील किंवा आई गेल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पुरुषांनी मुखाग्नी देण्याची परंपरा आहे. मात्र हाच पायंडा मोडत मुलींनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच मुलींनी खांदा देवून भरलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. सामाजिक कार्यकर्त्या आणि अनुभूति ट्रस्टच्या संचालक दीपा पवार यांच्या आईचे 25 ऑगस्टला निधन झाले होते. […]
Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal) धक्कादायक घटना घडली आहे. एका मठामध्ये वृद्ध वैद्यासह 60 वर्षीय सेवेकरी महिलेची हत्या करण्यात आली आहे. घटना सज्जनगड (Sajjangad) येथील मठात 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीय आली आहे. यानंतर काही तासाच यातील मारेकऱ्यांना अटक करण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे. लक्ष्मण उर्फ चरणदास चंपत शेंडे (95, रा. कापशी, ता. […]
Yevgeny Prigozhin: वॅग्नर ग्रुपचे (Wagner Group) प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचे निधन झाले आहे. खुद्द रशियाने (Russia) याला दुजोरा दिला आहे. प्रीगोझिन यांना मंगळवारी रशियातील सेंट पीटर्सबर्ग (Saint Petersburg) शहरात दफन करण्यात आले. मात्र, सर्व पुरावे मिळूनही प्रिगोझिन जिवंत असल्याची चर्चा सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे असे दावे खुद्द रशियातूनच केले जात आहेत. या […]
Asia Cup 2023 : बांगलादेश आणि अफगाणिस्तान (Bangladesh-Afghanistan) हे संघ अनुक्रमे 1986 आणि 2014 पासून आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) सहभागी होत आहेत. जरी दोन्ही संघांना आशिया चषक जिंकता आलेला नसला तरी या स्पर्धेत त्यांनी मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. बांगलादेशने आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत केले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान […]
Horoscope Today 30 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
मुंबईः राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. तलाठीपदाच्या परीक्षा सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून लवकरच नोकरभरती करण्यात येत आहे. बाह्ययंत्रणेमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहे. या परीक्षा पारदर्शी घेतल्याचा जात असल्याचा दावा राज्य सरकारचा आहे. परंतु यातील एका परीक्षेसाठी असलेले एक हजार रुपये शुल्क व परीक्षा केंद्र दूर येत असल्याने परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक […]
केरळमधील (Kerala) कोझिकोड विमानतळावरून 44 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह (Drugs) एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याला कोझिकोड विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील असून केनियातील (Kenya) नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) केरळमधील कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. डीआरआयच्या कालिकत प्रादेशिक युनिटने उत्तर प्रदेशातील रहिवासी राजीव कुमार याच्याकडून 3.5 किलो कोकेन आणि […]
Jawan New Song Out: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या किंग खानच्या (Shah Rukh khan) जवान या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाचा प्री व्ह्यू गेल्या काही दिवसाअगोदर प्रदर्शित झाला. तसेच या सिनेमामधील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी देखील चाहत्यांच्या भेटीला आली. आता या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान […]