उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी ते स्वतःला अजूनदेखील मुख्यमंत्री समजतात. आज धाराशिव येथे मोदी@९ निमित्त विशाल जाहीर सभा झाली या सभेत बोलताना फडणवीसांनी स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. नंतर सारवासारव करत उपमुख्यमंत्री असा केला. (Fadnavis still did not forget, referred to himself as Chief Minister in […]
Adipurush controversy : ‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. चित्रपटाच्या टीझरवरून सुरू झालेला वाद रिलीज झाल्यानंतरही सुरूच आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसोबतच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र न देण्याचे […]
Ashes 2023: चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लायनने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला ज्या पद्धतीने बाद केले […]
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा निर्णय म्हणजे धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर […]
Satwiksairaj & Chirag Shetty: भारतीय दिग्गज खेळाडू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशिया ओपन 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु किंदाबी श्रीकांत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चीनच्या ली शी फेंगने इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडू किंदाबी श्रीकांतचा पराभव केला. मात्र, […]
महाविकास आघाडीच्या काळात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आमच्या सरकारने बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा दिले. कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली, यावेळी ते बोलत होते. कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे येत्या एक वर्षात नागरिकांपर्यंत पोहोचेल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्री असताना कृष्णा- मराठवाडा सिंचन […]
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी येथील संसदेत हिंदू राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समविचारी खासदारांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाचे द्वेष आणि कट्टरतावादापासून संरक्षण करणे, हा याचा उद्देश आहे, असे ठाणेदार म्हणाले. कॅपिटॉल हिल येथे आयोजित पहिल्या हिंदू-अमेरिकी संमेलनात बुधवारी (ता. 14) रोजी ठाणेदार […]
Aurangzeb Photo Controversy in latur : राज्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा वाद काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. कोल्हापूर आणि अहमदनगरनंतर आता लातूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाचा शिवप्रेमींनी निषेध नोंदवला आहे. हे प्रकरण लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावचे आहे. औरंगजेबचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लातूरच्या किल्लारी […]
PM Modi Tenure : दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नामकरण करण्यात आले आहे. आता नेहरू स्मारक पीएम मेमोरियल म्हणून ओळखले जाईल. नामांतरावरून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. नावातील बदल हा सूडभावना आणि संकोचवादाचा परिणाम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि सोसायटी म्हणून ओळखली जाईल. अशा प्रकारे एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्याची […]
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघ कोल्हापूर टस्कर्ससमोर होता. ऋतुराज गायकवाडच्या कर्णधार असलेल्या पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्स संघाने पुणेरी बाप्पासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीला आलेल्या पुणेरी बाप्पाने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीमुळे […]