Ambegaon Election : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक देवदत्त निकम यांनी एकला चलोचा नारा दिला आहे. आंबेगाव राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे या पक्षात प्रथमच उभी फूट पडली आहे. गेली 35 वर्ष राष्ट्रवादी सोबत असलेले मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना […]
Kharghar Tragedy: महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पत्र दोन दिवसांपासून व्हायरल झाले होते. हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. आता याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा तपास रायगड स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघर येथे झाला होता. सुमारे वीस […]
Horoscope Today 23 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Gulabrao patil On Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांची उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये सभा आयोजित कारणात आली आहे. या सभेच्या नियोजनासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजच पाचोऱ्यात दाखल झाले. नेहमी प्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये आल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबरावांना उद्देशून जळगावमध्ये […]
पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते. पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. […]
Mali Blast: शनिवारी मध्य मालीमध्ये आत्मघातकी हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर या भीषण स्फोटात 60 हून अधिक लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात […]
Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आमचे आमदार चोरीला जातात त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ‘इंडिया टुडे राउंडटेबल’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. एका प्रश्नाला […]
सोन्याच्या भावात झालेल्या वाढीनंतरचा अक्षय्य तृतीया पहिलाच मुहूर्त. ग्राहकांनी सोनं हा अक्षय संपत्तीचा गुंतवणूक पर्याय निवडल्याचे दिवसभरात दिसले. त्यामुळे सोन्याचे भाव चढे असून देखील विक्रीत 5 ते 10 टक्के वाढ झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते व ते कायम राहीले. लग्नसराईच्या खरेदीचा मुहूर्तही अनेकांनी केला. सर्वच प्रकारचे दागिने, सोन्याच्या तारा, नाणी, बिस्किट आदींना मागणी होती. […]
MI vs PBKS : आयपीएलच्या 16व्या हंगामातील 31व्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून कर्णधार सॅम करणने 55 तर हरप्रीत सिंग भाटियाने 41 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने गोलंदाजीत […]
Supreme Court Corona Update : दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या केसेसमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांनाही कोविडची लागण (Corona Update) झाल्याची बाब समोर येत आहे. त्यामध्ये समलिंगी विवाह प्रकरणाच्या (Same-sex marriage case) सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठातील एका न्यायमूर्तींचा समावेश आहे. घटनापीठाच्या न्यायमूर्तींना कोरोनाची लागण झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात समलिंगी विवाह प्रकरणाची सोमवारी सुनावणी होणार नाही. […]