Virat Kohli Post On Tweet : सध्या लीगमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकूण चार सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. यावेळी त्याचे वेगळे रूप मैदानावर पाहायला मिळत आहे. या मोसमात कोहली मैदानावर अतिशय आक्रमक फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट कोहली हा सध्याच्या क्रिकेटमधील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. पण […]
Chhatrapati Sambhajiraje : ज्येष्ठ निरुपणकार अप्पापाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात मी पडणार नाही. पण आज अनेक जण खऱ्या अर्थान महाराष्ट्रसाठी आयुष्य घालवत आहे. त्यांनाही पुरस्कार दिला पाहिजे. हा पुरस्कार देण्यासाठी एक समिती गठीत करून अभ्यास करून महाराष्ट्रभूषण सारखे पुरस्कार देण्यात यावे, […]
Prithviraj Chavan On Shinde – Fadanvis : सध्या राज्यात अजित पवार यांच्या भूमिकेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबाबत बोलताना म्हणतात कि अजित पवार खरंच अमित शहा यांना भेटले का? ते अजित पवारांनाच विचारलं पाहिजे. खरच भेटले का हे सांगणार कुणी आहे का ? बघावं लागले. परंतु अशा चुकीच्या बातम्या पसरून शिंदे […]
Vivekananda Reddy murder case: माजी खासदार विवेकानंद रेड्डी हत्येप्रकरणी सीबीआयने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी (YS Bhaskar Reddy) यांना अटक केली आहे. भास्कर रेड्डी यांची अटक ही 48 तासांत सीबीआयने केलेली दुसरी अटक आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचा जवळचा […]
Horoscope Today 16 April 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Atique Ahmed : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आली आहे. या दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. हल्ला झाल्यांनतर मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. […]
Bike Rider Entered Amit Shahs Convoy : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दोन दिवसाच्या मुबईच्या दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांचा ताफा मुबई विमानतळावरून सह्याद्री अतिथी गृहाकडे असताताना एक दुचाकीस्वार अचानक अमित शाह यांच्या ताफ्यात शिरला. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून लगेच त्याला सोडून दिले. शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस अमित […]
Unseasonal Rain in Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर पिकांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. […]
Sudhir Mungantiwar On Action : महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त श्री. अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने आज सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आज मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय […]
Smita Ashtekar on Fiare : अडत व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे हे भिंगारचे जावई आहेत. त्यांच्यावर लोकप्रतिनिधीच्या पीएने भ्याड हल्ला केला आहे. लोकप्रतिनिधीच्या पीएवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या महिला नेत्या स्मिता आष्टेकर यांनी दिला आहे. नितीन चिपाडे यांना समाजकंटकांकडून मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या […]