- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
ChatGPT च्या नवीन आवृत्तीने जगाला केले चकित, आजारावरही सांगते नेमके औषध
Microsoft कॉर्प-बॅक्ड स्टार्टअप OpenAI ने ChatGPT, GPT-4 ची नवीन आवृत्ती आणली आहे. असे म्हटले जात आहे की हे एक शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील, विश्वासार्ह आणि अचूक माहिती देते. नवीन आवृत्तीबद्दल असा दावा केला जात आहे की ते प्रश्नांची अधिक अचूक उत्तरे देत आहे. ते आजारावर योग्य औषधही सांगतो. GPT-3.5 चा […]
-
जागा तीच, मैदानही तेच! उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे घेणार खेडमध्ये सभा, योगेश कदम म्हणतात…
रामदास कदम यांचा गड मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे देखील सभा घेणार आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ट्विटद्वारे या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा. असं लिहीत योगेश कदम यांनी व्हिडीओ […]
-
IT Engineer Suicide Case : पत्नी अन् मुलाचा खून : ‘त्या’ घटनेचा पोलिसांनी लावला छडा…
पुणे : औंध परिसरात राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने बुधवारी (दि. १५) आपल्या राहत्या घरात पत्नी व मुलाचा खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान, याप्रकरणाचा पाेलिसांनी तपास केला आहे. तपासानंतर मृत अभियंत्याच्या आत्महत्येचं गुढ उलगडलं आहे. खासगी व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने आयटी अभियंत्याने पत्नीसह आपल्या मुलाचा खून करुन आत्महत्या केल्याचा […]
-
पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, रिक्षाचालकाचे दुर्दैवी कृत्य
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात (Pune Crime) महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या (molestation) घटना वाढताना दिसत आहेत. गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (University Pune) परिसरात एका तरुणीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातही तरुणी […]
-
Sai Resort प्रकरणी अनिल परबांना तिसरा झटका!
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना तिसरा झटका बसला आहे. सर्कल अधिकारी सुधीर पारबुळे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ही तिसरी अटक असल्याने अनिल परब […]
-
लाँगमार्च आंदोलन : Eknath Shinde शेतकरी, आदिवासींना काय म्हणाले…?
मुंबई : राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात येईल. लाँगमार्च आंदोलन थांबविण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे केले. नाशिकहून शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला असून माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या […]
-
Sunil Tingre यांना मुख्यमंत्र्यांचे अश्वासन : समाविष्ट ३४ गावांसाठी १२०० कोटींचा आराखडा!
पुणे : पुणे महापालिकेत (Pune Munciple Corporation) समाविष्ट ३४ गावांमधील मूलभूत सोयीसुविधांसाठी वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत सांगितले की, या ३४ गावांमध्ये पायाभूत सोयी सुविधांसह विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी विशेष निधी देण्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. गावांमधील […]
-
Ind Vs Aus ODI : भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला; विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आज मुंबई येथे सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 188 धावांमध्ये संपूष्टात आला आहे. भारताच्या तडाखेबंद गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांनी नांगी टाकली आहे. भारताकडून मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्याआहेत. भारताला 50 ओव्हर्समध्ये विजयासाठी 189 धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श […]
-
आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर, गरज असेल त्याला स्वच्छ करून घेतो; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्त्यव्य
आमच्याकडे गुजरावरून आलेली निरमा पावडर आहे. गरज असेल तर आम्ही त्याला स्वच्छ करून घेतो, अशा स्वरूपाचं वक्तव्य भाजप आमदार रमेश पाटील यांनी केल्यामुळे राज्यभर पुन्हा एकदा निरमा पावडर ट्रेंडिगवर आली आहे. पण यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत टार्गेट केले. ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई […]
-
Air India : नॉन फ्लाइंग कर्मचार्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर : ३० एप्रिलपर्यंतच मुदत!
मुंबई : एअर इंडियाने (Air India) आपल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची (Voluntary Retirement to Non-Flying Staff) आँफर पुन्हा एकदा दिली आहे. १७ मार्चपासून येत्या ३० एप्रिल २०२३ पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १७) रोजी एअर इंडियाने नॉन फ्लाइंग कर्मचार्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची ऑफर पुन्हा एकदा दिली आहे. मागील वर्षी जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचा […]









