पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) रोजी मंजूर करण्यात आला. मिळकतकरात आणि पाणीपट्टी दरात दरवाढ नसलेला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८ कोटींचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२८ कोटी रुपयांच्या अर्थसंल्पास एकाच दिवसात मंजुरी दिली. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. ७१८ कोटी […]
ढाका : शेर-ए-बांगला (BAN vs ENG) राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेश संघाने (bangladesh Cricket team) 16 धावांनी विजय मिळवला. या सामन्यासह बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला. बांगलादेशने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडला 3-0 असा क्लीन स्वीप दिला आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा […]
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती येत्या तीन महिन्यांत आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंगळवारपासून (दि. १४) पुन्हा एकदा या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यात यावर एकनाथ शिंदे (EKnath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाकडून बाजू मांडून झाल्या आहेत. मात्र, अपात्र आमदारांचा (MLA) मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे दिसत आहे. परंतु, यासाठी कायद्यात […]
पुणे : राज्यात H3N2 चं संकट वाढतंय. शुक्रवारपर्यंत राज्यात 170 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधीक फैलाव झाला आहे. सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासंबंधी (Corona) कोणतेही लक्षणं जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढतंय. या व्हायरसमुळे देशात तीन मृत्यू झाले आहेत तर महाराष्ट्राच्याही […]
अहमदनगर : मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र ठरवलं त्यांचा कार्यक्रम करत असतो, हा माझा स्वभाव आहे. परंतु आता थांबायचं नाही. शेवगावात येऊन भांडणे लावायची,जनतेला भावनात्मक करून,जातीयवाद करून मते मिळवायची. आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी (Monica Rajle) यांचा धंदा असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा हे एकमेव ध्येय समोर […]
Ramdas Kadam : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी ईडीने माजी SDO जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने ही दुसरी अटक केली आहे. याआधी ईडीने सदानंद कदम यांना या साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते अनिल […]
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort case) तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे (Jairam Deshpande) यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर परवाना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ट्विट करत जयराम देशपांडे यांनी अनिल परब, सदानंद कदम यांच्या संगनमताने फसवी परवानगी दिल्याचे म्हटले आहे. याआधी ठाकरे गटाचे […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना हवाहवासा असणारा नेता आखेर भाजपमध्ये आला आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांच्याबरोबर मुलगा नकुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्षात प्रवेश केला आहे. अनंतराव देशमुख यांनी माजी पंतप्रधान […]
Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने याची घोषणा केली आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार सांगली येथे रंगणार आहे. 23 आणि 24 मार्च रोजी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वांना महिलांची कुस्ती पहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद झाली. […]