निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला मोठा दणका देत आरक्षण वाढीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणी बाबत FIR दाखल झाला आहे त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल.
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनावेळी मोदींच्या भाषणाची नव्हे तर, भर स्टेजवर हजारो उपस्थितांसमोर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीची झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बालभारती ते पौडफाटा रस्त्याला अखेर नगर विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
एअर इंडिया कंपनीचे AI175 हे विमानबंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला निघाले होते. त्यावेळी एका प्रवाशाने खाण्यासाठी काही पदार्थ मागवलो होते.