मुंबई : एकीकडे लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असतानाच काँग्रसमधील अंतर्गत धुसफूस समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटासमोर काँग्रेस झुकली असल्याचा जाहीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. तसेच अमोल कीर्तिकरांसाठी आपण काम करणार नसून, आठवडाभर पक्षातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेता याची वाट बघणार असून, अन्यथा मी वेगळा […]
Prakash Ambedkar Annaoused Loksabha Candidate Name : प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करत लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत युती करणार असल्याचीही घोषणा केली आहे. मात्र, याबाबत जरांगेंनी 30 मार्चपर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आल्याचे आंबेडकरांनी सांगितले. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे […]
अहमदनगर : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उमेदवारीला मोठा विरोध होत असतानादेखील उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना (Bhausaheb Waghchaure) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीत (Shirdi Loksabha) ठाकरेंची विजयाची मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतून महाविकास आघाडीचा उमेदवार […]
मंचर : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी मध्य साधल्याची भूमिका निभावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केले असला तरी, देखील घड्याळ्याच्या हातात शिवबंध कायम राहणार असल्याचे आढळराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. आढळराव पटलांच्या जाहीर प्रवेशामुळे […]
मुंबई : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या विजय शिवतारेंवर (Vijay Shivtare) शिस्तभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. शिवतारेंना शिवसेनेकडून शिस्तभंगा कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले जात असून ही नोटीस आज (दि.26) पाठवणार आहे. या कारावाईमुळे शिवतारेंना पक्षाचे आदेश न पाळणे आणि अजितदादांविरोधात दंड थोपटणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. शिवतारेंनी पक्षाचा आदेश न मानल्यास […]
Francis Scott Key Bridge In US’ Baltimore Collapses After Ship Collision : जहाजाने दिलेल्या भीषण धडकेनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे ही भीषण घटना घडली आहे. या घटनेत जिवीतहानी झाल्याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी या पुलावरून वाहनांची वर्दळ होती. […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]