Railways employees : दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या 11 लाखांहून (Railways employees) अधिक बिगर गॅझेट कर्मचाऱ्यांना गिफ्ट (Diwali Bonus) दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅझेट नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 11 लाख 340 रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सरकारी तिजोरीवर […]
Azam Khan : यूपीचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान (Azam Khan), त्यांची पत्नी डॉ. ताजीन फातमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना रामपूर (एमपी-एमएलए) न्यायालयाने प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे तिघेही आज कोर्टातून थेट तुरुंगात जाणार आहेत. हे प्रकरण अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित आहे. भाजप […]
Lalit Patil Drugs Case : ड्रग्जमाफिया ललीत पाटील हे प्रकरण गाजत असताना पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. येरवडा कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते या कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. सुनावणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात आणले जात होते. त्याच वेळेला त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले आहे. […]
same-sex marriage : समलैंगिक विवाहाबाबत (same-sex marriage) आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. समलिंगी विवाह हा मूलभूत हक्कांच्या श्रेणीत येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. देशाच्या संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. समलैंगिक विवाहाच्या या निर्णयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही […]
Gopichand Padalkar on Sharad Pawar : धनगर समाजाची मागणी एसटीमधून आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेले एनटी आरक्षण (Dhangar reservation) देत धनगर समाजाची दिशाभूल केली. पवारांनीच धनगरांचा गेम केला आहे. प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल अशीच शरद पवारांची नीती असून शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झालं आहे. यामुळे पवारांच्या […]
Prajakta Tanpure : जनतेची काम तातडीने होत असून हे केवळ गतिमान सरकारमुळे शक्य झाले अशी वक्तव्य सध्या सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र सरकारच्या याच घोष वाक्याचा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पाथर्डीत नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये काम करून घेताना निर्माण झालेल्या अडचणी तनपुरे यांनी जाणून घेतल्या. गतिमान सरकार म्हणायचे आणि गरीब लोकांना ताटकळत […]
Same Sex Marriage : समलिंगी जोडप्यांसाठी (Same Sex Marriage) आजचा दिवस मोठा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने समलैंगिक विवाहाबाबत आपला निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहाला मान्यता मिळणार नाही, परंतु असे जोडपे मूल दत्तक घेऊ शकतात. यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना समलैंगिक […]
Rahul Narwekar : येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचे नवीन वेळापत्रक सादर करा, ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर आम्ही वेळापत्रक देऊ, असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा इशारा दिला. Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार […]
Sujay Vikhe Patil: लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. फायरींग रेंजसाठी जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र एकीकडे असे असताना दुसरीकडे खासदार सुजय विखे यांनी या प्रश्नावर मास्टर स्ट्रोक लगावत विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे. के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या […]
World Cup 2023 : लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकच्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाने श्रीलंका संघाचा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव करून 5 विकेट्सनी मात केली. कांगारू संघाच्या पहिल्या विजयात फलंदाज जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श आणि गोलंदाज अॅडम झम्पा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लिशने 5 चौकार आणि […]