- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
ट्विटरच्या लोगोत बदल, चिमणी उडाली भुर्रर…आता ‘डॉगी’ दिसू लागला
नवी दिल्ली : ट्विटरची मालकी टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांनी घेतल्यापासून ते सातत्याने यामध्ये काहींना काही बदल करत आहे. यापूर्वी त्यांनी ब्ल्यू टिकसाठी शुल्क ठेवले. विनाशुल्क ही सेवा बंद केली. हे सगळं सुरु असताना आजवर ट्विटरचे लोगो (TwitterLogo) असलेली चिमणी देखील आता गायब होणार आहे. कारण चिमणीची जागा आता डॉग घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु […]
-
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? शिंदेंनी केला आरोप
अहमदनगर : शिवसेनेच्या नेत्या तसेच अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांच्या विषयी एक महत्वाची महिती समोर आली आहे. दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर दिपाली यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले असल्याचा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तसेच दिपाली यांचे पाकिस्तानच्या बँकेत देखील खाते […]
-
गरजेपेक्षा जास्त लिंबाचे सेवन ठरते घातक
मुंबई : आपण आजवर लिंबाचे अनेक फायदे पाहिले असतील. लिंबू हे बहुगुणकारी फळ आहे. याचे अनेक फायदे आपण आजवर ऐकले तसेच अनुभवले असतील. वाढते वजन असो अथवा पोटाच्या समस्यां यावर लिंबू हे बहुगुणकारी ठरते. तसेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील याचा प्रभावी वापर केला जातो. आपण थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी देखील पितो. आपण आजवर लिंबाचे […]
-
अशोक चव्हाण भाजपात जाणार? संजय शिरसाटांना भविष्य सांगणाऱ्या पोपटाने सांगितले की काय ?
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) हे येत्या काळात लोकसभा निवडणुकीआधीच भाजपामध्ये जातील असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार शिरसाट यांना भविष्य सांगणाऱ्या पोपटाने याची माहिती […]
-
पूर्व हडपसर-वाघोली स्वतंत्र महापालिकाबाबत राज्य शासनाने उचलले मोठे पाऊल
पुणे : पूर्व हडपसर-वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत आता राज्य शासनानेच महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. या मागणीनुसार आता स्वतंत्र महापालिकेच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. दरम्यान याबाबतची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. महापालिकेत 34 गावांंचा समावेश करण्यात आला आहे. […]
-
मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी वाढणार
पुणे : ईडीच्या (ED) पथकाने सकाळीच पुण्यातील 9 मोठ्या व्यावसायिकांच्या घरावर तसेच त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली असल्याने संबंधित ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी या व्यावसायिकांचे कनेक्शन असल्याच्या संशयावरून […]
-
उद्धव ठाकरेंना धक्का… पुण्यातून ‘हा’ सैनिक भाजपच्या वाटेवर
पुणे : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट असे तयार झाले. त्यानंतर शिंदे यांनी ठाकरे यांना धक्कातंत्र देत अनेक महत्वाचे नेतेमंडळी आपल्या पक्षात घेतले. दरम्यान आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुण्यातून एका मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आणखी एका सैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपच्या दिशेने वाटचाल केली आहे. शिवसेनेचे माजी पुणे […]
-
आता ‘या’ ठिकाणी 7.0 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शक्तिशाली भूकंप देखील झाले आहे. यातच पुन्हा एकदा अशीच एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) आणि तिबेटमध्ये (Tibet) भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. तिबेटमधील शिझांग (Sarang) शहरात रविवारी-सोमवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के […]
-
ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद
मुंबई : गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ने देशाला आतापर्यंत 12 असे सर्वोत्कृष्ट गायक दिले आहेत. आणि या शोचा 13 वा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर या शोच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. इंडियन आयडॉल 13 ची (Indian Idol 13 Winner) विजेती ट्रॉफी अयोध्येतील रहिवासी ऋषी सिंहने (Rishi Singh)जिंकली आहे. […]
-
शिर्डीतील यात्रेतील पाळणा कोसळला, चारजण जखमी
अहमदनगर : शिर्डी (shirdi) येथील रामनवमी निमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या यात्रेतील एका पाळणा कोसळल्याने चारजण जखमी झाले आहे. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना साईबाबा रुग्णालयात (Saibaba Hospital) दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील जखमींची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्यात याव्या अशा […]









