- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
दानवेही आले अडचणीत; घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या डायरीत नाव
मुंबई : राज्यभर गाजलेल्या 30-30 घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे. राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्यात. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांची […]
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
पुणे : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज (ता.16 जानेवारी) जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. यावेळी त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली. ‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. […]
-
ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल
मुंबई : नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर शुभांगी पाटील या देखील निवडणुकीत उभ्या राहिल्या. […]
-
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे 10 फलंदाज
मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 166 धावांची तुफानी खेळी खेळली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला. चला तर आज आपण त्या 10 फलंदाजांबद्दल माहिती जाणुन घेऊ ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत भारताच्या चार फलंदाजांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सचिन तेंडुलकर […]
-
आता राज्यातील ‘या’ 10 हजार अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलन
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी देखील संपाचे हत्यार उगारले होते. त्यातच आता […]
-
विजयच्या ‘वरिसु’ चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला
मुंबई : थलपथी विजय आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘वरिसु’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत 80 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाने जगभरातून मोठाच गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसातच या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातून 103 कोटींची कमाई केली. थलपथी विजय आणि रश्मिका मंदाना अभिनीत वारिसू, 11 जानेवारीपासून रिलीज झाल्यापासून […]
-
नेपाळमध्ये प्रवाशी विमान कोसळलं; 32 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : नेपाळमधील पोखरा येथे प्रवाशी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळले. या अपघातात आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात 72 जण असल्याची माहिती समोर येत असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. नेपाळमधील पोखरा येथे प्रवासी विमान कोसळले असून त्यात एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर […]
-
भारत श्रीलंकेत आज अंतिम सामना
मुंबई : भारतीय संघ आज यजमान श्रीलंका यांच्याविरुद्ध तिसरा व अंतिम सामना आज खेळणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन सामन्याच्या या मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर आहे. तसेच आजचा अंतिम सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. तर विजय मिळवून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा असेल. तिसरा वनडे रविवारी […]
-
आठव्या वंदे भारत ट्रेनला मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाला मोठी भेट देणार आहेत. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान आज हिरवा झेंडा दाखवतील. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणारी ही ट्रेन पोंगलच्या शुभमुहूर्तावर सुरू होईल. या नवीन ट्रेनचे ऑपरेशन 16 जानेवारीपासून सुरू होईल, परंतु बुकिंग शनिवारपासूनच सुरू झाले आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) नुसार, विशाखापट्टणम-सिकंदराबाद […]
-
मुंबईच्या ‘बारम’ने मिळविला अहमदनगर महाकरंडक
अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा सावेडीतील माऊली सभागृहात उत्साहात झाली. यात तरुणाईचा मोठ्या उत्साह व जल्लोष पहायला मिळाला. यावेळी मुंबईतील महर्षी दयानंद कॉलेजच्या ‘बारम’ या एकांकिकेने प्रथम तर मुंबईच्याच गुरुनानक खालसा स्वयत्त महाविद्यालयाच्या ‘काही तरी अकडलंय’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघाला १ लाख […]










