Prasad and Shreya : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे (Shyreya Bugade) हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे […]
Narhari Zirval & Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाने उचल खाल्ली आहे. छगन भुजबळांनंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती यादीत समावेश करण्याचा विचार आणि प्रस्ताव सरकारने करू नये,असा सरकारला दिलाय. त्यामुळे अजित दादांचे शिलेदार शिंदे सरकारची डोकेदुखी ठरताना दिसत आहेत.
Extramarital affair : संसदीय समितीने केंद्र सरकारला केलेल्या एक शिफारसीनुसार भारतात पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंध गुन्ह्याच्या कक्षेत येणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Herbal Hookah : हर्बल हुक्का पिल्याने शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही असा लोकांचा विश्वास आहे. मात्र यामध्ये किती सत्य आहे याबद्दलची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
Women’s Hygiene : महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजही उघडपणे बोललं जात नाही.अनेक ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम,एनजीओ, शिवाय काही सरकारी योजनांच्या माध्यमातून सुद्धा महिलांच्या आरोग्या बाबत जनजागृती केली जाते आहे. महिलांच्या आरोग्याची स्वच्छता कशी याबद्दल जाणून घ्या.
Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत चालला आहे. त्या दरम्यान सर्वच क्षेत्रातील लोक या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात काहींच्या प्रतिक्रियांमुळे वादही निर्माण होत आहेत. त्यात आता सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. […]
Jayakwadi Dam : अहमदनगर व नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीला पाणी (Jayakwadi Dam) सोडण्यात येऊ नये. यासाठी अनेक आंदोलने झाली. नगर जिल्ह्यात यासाठी राजकीय नेतेमंडळी तसेच लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला एकत्रित येत ठराव देखील झाला. मात्र न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्यात यावे असा निर्णय दिला. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नगर जिल्हयातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. न्यायालयाचा […]
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात नुकताच किरकोळ वादाचा शेवट देखील अत्यंत भयानक होत असतो. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्या-शेजाऱ्यांचे असलेल्या वादातून एकाने आपल्या चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवत थेट मायलेकांना गाडी खाली चिरडले असल्याची धक्कादायक घटना समोर […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राजस्थान निवडणुकीबाबत एक दावा केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत. की, राजस्थानमध्ये अशोक गहलोत हेच जिंकणार आहेत. त्याचबरोबर हा दावा करताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला आहे. पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार… राजस्थान निवडणुकीबाबत अशोक गहलोत हेच जिंकणार हा दावा करतताना राऊत म्हणाले […]