मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझान मोहम्मद खान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची सतत चौकशी सुरू आहे. आता शिझानने खुलासा केला आहे की, तुनिषाने या अगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी याप्रकरणाची चौकशी लव जिहादच्या बाजूने व्हावी. तर तुनिषा शर्माचे 15 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. वयातील अंतर […]
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कचनेर येथील प्रसिद्ध असलेल्या जैन मंदिरातून दोन किलो वजनाची एक सोन्याची मूर्ती चोरी झाली होती. या प्रकरणी मध्यप्रदेशातील या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 94 लाख 87 हजार 797 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनीष केलवानिया यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. […]
नगर : अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ आहेत. अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे या मतदार संघांची नावे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाचे नाव बदलावे. असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. मात्र त्यांनी यावेळी टीकेच्या ओघात त्यांनी आपले मत मांडताना अहमदनगर जिल्ह्याबाबत चुकीची […]
नागपूर : अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी सभागृहात महाविकास आघाडीने सभागृहात जोरदार निदर्शने केली. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राजीनामा द्या राजीनामा […]
नागपूर : ‘आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.’ अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यात […]
नागपूर : ‘मला एक तरी उदाहरण असं दाखवा की, महाराष्ट्रात कन्नड भाषिकांवर अत्याचार करण्यात आले. मात्र कर्नाटक सरकार तेथील मराठी भाषिकांवर अत्याचार करते. या अगोदर काहींनी सभागृहात सांगितलं की, आम्ही देखील सीमावादामध्ये लाठ्या खाल्ल्या आहेत. मात्र तुम्ही लाठ्या खाल्ल्या त्यावेळेस तुम्ही आमच्या पक्षात होतात. आता तुम्ही सीमापार गेले आहात. कर्नाटक, महाराष्ट्रात आणि दिल्लीत सध्या एकाच […]
नागपूर : ‘आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण महाराष्ट्राचा विषय सोडून मुख्यमंत्र्यांना दिले जाण्याची गरज नव्हती. दिल्लीत ते महाराष्ट्राच्या सीमा वादावर बोलणार आहेत का ? गृहमंत्र्यांसोबत चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्री एकत्र आले. मात्र सर्वोच्च न्यायालयात हा खटला जोपर्यंत दाखल आहे, प्रलंबित आहे. तोपर्यंत परिस्थिती जैसे ठेवायची भूमिका आपल्या सरकारची आहे. मात्र कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सर्वोच्च […]
नागपूर : आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवन परिसरातल्या पक्ष कार्यालयात आदित्य ठाकरेंच्या रक्षणार्थ बैठक घेणार आहेत. या बैठकीबरोबरच सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरल्यास त्यांच्या रक्षणार्थ सत्ताधाऱ्यांचे आक्रमण कसे परतावून लावायचे यासाठी रणनिती आखण्यात […]
नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर जयंत पाटलांचे निलंबन झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार खुश होते. असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर, निलंबन झाल्याने अजित पवार खुश […]
सातारा : भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. जयकुमार गोरे […]