श्रीराम मंदिरामुळे व्यापाऱ्यांचीही चांदी : बाजारपेठेत एक लाख कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज

श्रीराम मंदिरामुळे व्यापाऱ्यांचीही चांदी : बाजारपेठेत एक लाख कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज

अयोध्या : उद्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा ऐतिहासिक सोहळा देशातील विविध ठिकाणीच्या राम मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये दिवाळी सणासारखाच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी उद्या कुठे अर्धा दिवस तर कुठे पूर्ण दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, याच उत्साहाच्या वातावरणाच व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत असून व्यावसायिकांचा करोडोंचा व्यवसाय होत असल्याचे समोर आले आहे. CAT म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या दाव्यानुसार राम मंदिर कार्यक्रमासाठीच्या वातावरणामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. (atmosphere for the Ram Mandir event has generated business worth over one lakh crore rupees to traders across the country.)

Ayodhya Ram Mandir : उद्याच्या सुट्टीवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; याचिका फेटाळली…

कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, सोमवारी दिल्लीत दोन हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. तर देशभरात 30 हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शतकात एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन पहिल्यांदाच होत असावे. त्या पार्श्वभूमीवर घरे, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. मातीचे दिवे विकत घेणारा लोकांचाही ओघही कायम आहे. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत.

वर्गातच ‘जय श्रीराम’चा नारा : सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी केली बेदम मारहाण

कॅटने सांगितले की, सोमवारी राम मंदिरात कार्यक्रम होणार आहे, तेव्हा देशभरातील व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. यादरम्यान, व्यापारी समुदायामध्ये ‘हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या’ ही राष्ट्रीय मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी 22 जानेवारीला आपापल्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हे सर्व कार्यक्रम बाजारपेठेतच होणार आहेत, त्यामुळेच उद्या दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube