रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी

रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी

PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करून राममय आज अभिमानास्पद वाटत आहे. जगातील कोणत्याही देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचायचे असेल तर त्याचा वारसा जपलाच पाहिजे, असेही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते अयोध्येतील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

IND vs SA Test : आफ्रिकेला दुसरा धक्का! बावुमानंतर ‘या’ खेळाडूची दुसऱ्या कसोटीतून माघार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेनं वाट पाहात आहेत, मीही तुमच्यासारखाच उत्सुक आहे. 1943 मध्ये आजच्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वज फडकावत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आज आपण स्वातंत्र्याच्या अमर काळाचा संकल्प पुढे नेत आहोत.

31st संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन! वर्षाचे समापन होणार आणखीनच धमाकेदार..

डिजीटल टेक्नॉलीच्या क्षेत्रात देखील मोठी प्रगती केली आहे. आज या ठिकाणी विकासाची भव्यता दिसत आहे. अयोध्या नगरी संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला दिशा देणार आहे. अयोध्येत मंदिर झाल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकाच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. अयोध्येत आज हजारो कोट्यवधी रुपयांची कामं सुरु झाली आहेत.

आज अयोध्येत नवीन रस्ते, फुटपाथ, नवे पूल बनवले जात आहेत. अयोध्येच्या विकासामध्ये कोणतीही कसर सोडली जाणार नाही. आज मला अयोध्येच्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचं सौभाग्य मिळालं आहे. मला या गोष्टीचं आनंद आहे की, येथील विमानतळाचं नाव महर्षि वाल्मिकी यांच्या नावावरुन ठेवलं आहे.

आज विविध राज्यांमध्ये वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात आली आहे. वंदे भारत रेल्वेमध्ये गती आहे. वंदे भारतमध्ये गती आहे, आधनिकतेसोबत आत्मनिर्भर भारताचा गर्व देखील आहे. अत्यल्प वेळेत दीड कोटीपेक्षा जास्त लोकांनी प्रवास केला. विशेष म्हणजे तरुणांना ही रेल्वे खूप आवडली आहे.

आज अयोध्या नगरीतून विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला नवी ऊर्जा मिळत आहे. याठिकाणी 15 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube