Kaveri Kapoor: ‘मासूम: द नेक्स्ट जनरेशन’मध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार?

Kaveri Kapoor: ‘मासूम: द नेक्स्ट जनरेशन’मध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार?

Kaveri Kapoor: प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर (social media) त्यांची मुलगी कावेरी हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आणि या पोस्ट मधून अनेक चर्चाना उधाण आलं आहे. वेधक पोस्टमध्ये शेखर कपूर यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.” आणि आता मी बसून ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन (Masoom The Next Generation Movie ) लिहित आहे. मी तिच्या भूमिकेशी संघर्ष करत आहे. तिचा भाग लिहीत आहे.

कावेरीचा (Kaveri Kapoor) अभ्यासपूर्ण दृष्टीकोन जो पूर्वी शेखर कपूरच्या पोस्टमध्ये व्यक्त झाला होता. ही सोशल मीडिया पोस्ट चाहत्यांना ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन’ मधील काहीतरी गुंतागुंतीच्या कथेच्या गोष्टीची हिंट देते आहे. सोबतीला या चित्रपटात त्यांची मुलगी दिसणार का ? अश्या प्रश्नांच्या चर्चाना उधाण आलं आहे.

या सिनेमात लेखक शेखर कपूर यांनी त्यांच्या ‘मासूम’ या सुपरहिट (Social media) चित्रपटातून अफलातून गोष्ट तर प्रेक्षकांना दाखवली आणि आता याच चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी ‘मासूम’ सारखा दर्जेदार चित्रपट घडवला. शेखर कपूर यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मासूम’ कसा बनला? लोक मला वारंवार विचारतात.. मी याआधी कधीही चित्रपट केला नाही.

Kanni New Poster: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

तसेच चित्रपटाचा अभ्यास केला नाही, सेटवर कोणालाही मदत केली नाही.. आणि तरीही केवळ माझ्यावरच नव्हे, तर चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेवरही इतका विश्वास आणि विश्वास होता.. अभिनेते, क्रू, निर्माते आणि विश्वाचा.. मला कोणीही प्रश्न विचारला नाही.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी स्वतःला कधीच प्रश्न विचारला नाही. मासूम द नेक्स्ट जनरेशन हा नक्कीच खास असणार आहे मग तुम्ही तयार आहात ना ! तसेच शेखर कपूर त्याच्या आगामी चित्रपट ‘मासूम…द नेक्स्ट जनरेशन” बद्दल बोलत असताना एक अनोखा सिनेमा ठरणार असल्याची खात्री देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

शेखर कपूरच्या ‘बॅन्डिट क्वीन’ आणि ‘मिस्टर इंडिया अशा आयकॉनिक सिनेमाने भारतीय मनोरंजन उद्योगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. सिनेमासृष्टीतील शेखर कपूरच्या योगदानामुळे केवळ भारतीय मनोरंजन सृष्टी नाही तर त्यांनी घडवलेल्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज ​​या सिनेमानं देखील ऑस्कर पुरस्कार विजेत्या सिनेमासह आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे. सिनेमाद्वारे शोध लागण्याच्या अगोदर त्यांनी केट ब्लँचेट, एडी रेडमायन आणि हेथ लेजर यांसारख्या अभिनेत्यांसह काम केले होते. तसेच मनोरंजनसृष्टीत एक वेगळा दृष्टीकोन ठेवून काम करण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न आज देखील तितक्याच जोमाने असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र आता ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन’ पाहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube