Adipurush: ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त VFX ची निर्मिती करणारा मराठमोळा प्रसाद सुतार आहे तरी कोण?
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा 16 जूनला प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची चांगलीच जोरदार चर्चा होती. टीझर आणि ट्रेलर आल्यावर आदिपुरुष सिनेमातील VFX देखील खूप चर्चेत होते. VFX वर चाहत्यांनी टीकाही केली होती. पण या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरव्हायजर नेमकं कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण सुपरव्हायजर प्रसाद सुतार (Prasad Sutar) यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
25 वर्षांचा दांडगा अनुभव असलेले प्रसाद सुतार यांनी अनेक सिनेमासाठी VFX निर्मिती केली आहे. प्रसाद सुतार हे दिग्गज व्हिज्युअल इफेक्ट सुपरव्हायजर आहेत. त्यांनी तान्हाजी (Tanhaji Movie), बाजीराव मस्तानी, डॉन 2 आणि राजनीती यासारख्या सिनेमाकरिता काम केलं आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये गुलाम या सिनेमातून केली आहे.
या सिनेमात आमीर खान चालत्या ट्रेनसमोर उडी मारत असतानाचा सीन ज्या टीमने तयार केला होता. त्याच टीममध्ये प्रसाद सुतार होते. IMDB वरील त्याच्या मिळालेल्या बायोनुसार, त्यांनी CGI अॅनिमेटर म्हणून सुरुवात केली आणि कंपोझिटर आणि VFX सुपरव्हायजर म्हणून काम केले आणि शेवटी VFX डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून काम केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधील जवळपास 150 सिनेमामध्ये काम केले आहे.
2015 मध्ये VFX सुपरव्हायजर नवीन पॉलबरोबर पार्टनरशिप करून आणि सिंघमच्या प्रॉडक्शन हाउसच्या मदतीने सुतार यांनी VFX वाला नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. या कंपनीने केलेल्या कामामुळे त्यांना बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्ससाठी झी सिने पुरस्कार आणि तान्हाजीसाठी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता. आदिपुरुषसाठी प्रसाद यांनी स्वत: काम केले आहे. यामध्ये त्यांची कंपनी सहभागी नव्हती.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
गेल्या वर्षी टीझर आल्यानंतर NY VFXवाला यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये आपण या सिनेमासाठी काम केले नाही. आम्ही हे ऑन रेकॉर्ड सांगत असल्याचे देखील सांगितले होते. कारण आम्हाला मीडियाकडून सतत त्याबद्दल विचारलं जात असायचे. हे स्टेटमेंट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले होते. नुकताच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुतार यांनी सिनेमाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सच्या ट्रोलिंगबद्दल मोठे भाष्य केले आहे. “आम्ही गोष्टी पूर्णपणे बदलू शकत नाही.
ट्रोलिंगनंतर अॅनिमेशनमधील पात्रं पुन्हा दुरुस्त करणं, हे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले होते. आम्ही ते छान केले आहे. आम्हाला मिळालेल्या कमी वेळेमध्ये आम्ही सर्व गोष्टी सुधारण्यासाठी काम केले आहे. आम्ही ते जास्त रिअल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे,” असं त्याने यावेळी म्हणाले होते. ओम राऊत दिग्दर्शित, प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान यांच्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसून आले आहेत.