Khupte Tithe Gupte: मी, ते आणि ती..; अवधूत गुप्तेच्या पोस्टने वेधलं लक्ष

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 24T110554.372

Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या लोकप्रिय शोचा दुसरा सीझन (season) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या पहिल्या पर्वाला चाहत्यांनी मोठी पसंती दर्शविली आहे. आता दुसऱ्या सीझनसाठी चाहते मोठे प्रमाणात उत्सुक झाले आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)


अवधूत गुप्तेने (Avadhut Gupte) मनसे राज ठाकरेंसोबतच फोटो सोशल मीडियावरुन (Social media) शेअर केला आहे. या फोटोला त्याने “मी, ते (राज साहेब) आणि ती (खुर्ची).. ४ जूनला रात्री ९ वाजता! आता प्रत्येक रविवार…धारदार!!” असं कॅप्शन या फोटोला त्यांनी दिले आहे. अवधूत गुप्तेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. राज ठाकरेंचे ‘खुपते तिथे गुप्ते’मधील काही प्रोमो व्हिडीओ (Promo video) झी मराठीच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.

या व्हिडीओत राज ठाकरे अजित पवारांवर फटाकेबाजी करत असल्याचे दिसून आले आहे. अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होणार? असे म्हणत असल्याचे ते दिसत आहेत.

तसेच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये कला, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणते सवाल विचारण्यात येणार आहेत? हे बघण्यास चाहते उत्सुक आहेत. 4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड चाहत्यांना बघता येणार आहे.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत. गेल्या काही दिवसापासून ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये दिसत आहे ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजेरी लावणार आहेत. ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रसारित करण्यात होणार आहे.

Tags

follow us