बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल रांची कोर्टात सरेंडर, 2013 मध्ये केलं होतं ‘हे’ कांड

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल रांची कोर्टात सरेंडर, 2013 मध्ये केलं होतं ‘हे’ कांड

Amisha Patel Surrender : ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’ या चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तिला रांचीच्या न्यायालयात हजर राहावे लागले. फसवणूक प्रकरणात अमिषाला जामीन मिळाला आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, न्यायालयाने तिला 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अमीषा पटेलवर रांचीचे चित्रपट निर्माते अजय कुमार सिंग यांनी चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमक्यांचे आरोप केले होते. अमीषावर एका चित्रपटाच्या प्रमोशन आणि प्रसिद्धीसाठी रांची येथील चित्रपट निर्माता अजय कुमार सिंग यांच्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करायचे होते. पण 2013 मध्ये सुरू झालेला हा चित्रपट पूर्ण होत नव्हता. त्यामुळे अजय सिंगने त्याचे पैसे परत मागितले होते. अजय कुमार सिंह यांचे पैसे परत न केल्याचा आरोप अमिषावर आहे.

BAN vs AFG: बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव करत,112 वर्षाचा जुना विक्रम मोडला

अजय कुमार सिंह यांच्या वकील विजया लक्ष्मी श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या त्यांना जामीन मिळाला आहे, मात्र न्यायालयाने 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी अभिनेत्री अमिषा पटेलच्या वतीने तिचे वकील जयप्रकाश यांनी तिची बाजू मांडली. अमिषा पटेलच्या नावावर फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणी अनेक वेळा समन्स जारी करण्यात आले होते, मात्र ती कोर्टात हजर होत नव्हती. त्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते.

अनुदान केंद्र सरकारचं अन् गवगवा भाजपचा; अनुदानित खतांच्या पिशव्यांवर BJP चा प्रचार

चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांनी विधानात सांगितले होते की, अमिषा पटेलने ‘देसी मॅजिक’ चित्रपटाच्या मेकिंग आणि प्रसिद्धीसाठी अडीच कोटी रुपये घेतले होते. 2013 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती, मात्र आतापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. हे पाहून अजय कुमारने अमिषा पटेलकडे त्याचे पैसे मागितले असता तिने पैसे देण्याचे टाळण्यास सुरुवात केली होती.

दबाव आणून त्याने अडीच कोटींचा चेक दिला, पण तो बाऊन्स झाला. यानंतर अजय सिंह यांनी कोर्टात केस दाखल केली होती. याप्रकरणी अमिषा पटेल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आता 21 जून रोजी न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते हे पाहावे लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube