Gautami Patil: गौतमीचा नाद केला पण गुन्हा दाखल झाला; काय आहे नेमकं प्रकरण?
Gautami Patil : अल्पवधीत प्रसिद्ध झालेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील कार्यक्रम घेतल्याने पुण्यातील (Pune) भोसरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवसानिमित्त (birthday) गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे बर्थडे बॉयसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
काय आहे नेमकं प्रकरण?
सोमवारी अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील अमित लांडे यांनी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित लांडेसह आयोजक मयुर रानवडे अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रम कुठल्याही गोंधळाविना पार पडला, असा दावा आयोजक रानवडे करत आहे. पण परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बर्थडे बॉय अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी दिली नव्हती.
पोलिसांनी परवानगी नाकारलेली असताना देखील अमित लांडे आणि मयुर रानवडे यांनी गौतमीचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दरम्यान गौतमीने आपल्या नृत्याने महिला आणि तरुण-तरुणींची मने जिंकली. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या लहान मुलांना देखील नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गौतमीच्या कार्यक्रमात लहान मुलेही थिरकले असल्याचे बघायला मिळाले आहे.
The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास
पिंपरी चिंडवडमधील गौतमीचा कार्यक्रम गोंधळाविना पार पडला आहे. तिच्या या कार्यक्रमाला पिंपरी-चिंडवडकर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तिच्यासोबत तिचे सुरक्षारक्षक देखील मोठ्या प्रमाणात दाखल होते. त्यामुळे तिच्या या कार्यक्रमाला गोंधळ झाला नाही. गौतमीने आपल्या नृत्याने चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी दिली.
गौतमी पाटीलचा चाहतावर्ग मोठा आहे. महाराष्ट्रभर सध्या तिची चांगलीच क्रेझ आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. गौतमीच्या कातिल अदा बघण्यासाठी चाहते मोठे उत्सुक असतात. दिवसेंदिवस गौतमीच्या कार्यक्रमाला मागणी वाढत जात असल्याचे दिसून येत आहे.