सत्तेतून पैसा पैशांतून सत्ता, आमचं कामच नाही; बावनकुळेंनी सांगितले कसब्यातील पराभवाचे कारण
BJP : कसबा पोटनिवडणुकीत (kasba Bypoll Result) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही कुठे कमी पडलो, काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे आत्मचिंतन आम्ही करणारच आहोत. मात्र, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काम काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहे. भाजप तर संस्कार आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच निवडणूक लढतो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली.
हे सुद्धा वाचा : चिंचवडच्या पराभवावर माजी मुख्यमंत्री चव्हाण संतप्त.. म्हणाले, भाजपच्या फायद्यासाठी वंचितने..
निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आरोपांचे बावनकुळे यांनी खंडण केले. अजित पवार यांनी निवडणुकीच्या आधी व्हिडिओ दाखवायला पाहिजे होते. निवडणुकीनंतर दाखविण्याचे कारण काय हे मला समजत नाही. पैसे वाटून मते मागायची हे काम भाजपचे नाही. सतेतून पैसा आणि पैशांतून सत्ता हे केवळ महाविकास आघाडीचेच काम आहे, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.
Chinchwad Byelection : राहुल कलाटे यांच्यामुळे नानांच्या विजयात काटे
कसबा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तर चिंचवड निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. गेल्या 28 वर्षांपासून कसब्याची जागा भाजपकडे होती. यंदा मात्र ही जागा गेली आहे. हा पराभव आम्हाला मान्यच आहे. पराभव का झाला याची विवेचन आम्ही करणार आहोत, असे बावनकुळे म्हणाले.
कसब्यातील पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघातील लोकांची नाराजी, तसेच निवडणुकीआधी घडलेले काही प्रकार, आजारी असतानाही गिरीश बापट यांना प्रचार करण्यास भाग पाडणे अशी काही कारणे विरोधकांकडून देण्यात येत आहेत. तसेच निवडणुकीनंतर लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातूनही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजप या गोष्टींचा विचार करणार का, हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.