Priyanka Chopra: “मला तुझे अंडरगार्मेंट्स…” : देसी गर्ल प्रियांका चोप्राचा खळबळजनक खुलासा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 24T124816.020

Priyanka Chopra: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ (Desi Girl) अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) गेल्या काही दिवसाखाली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीपासून लांब जाण्या पाठीमागचा मोठा खुलासा तिने यावेळी सांगितलं आहे. यावेळी तिने बॉलिवूडबाबत (bollywood ) एक धक्कादायक खुलासा केले होते. इंडस्ट्रीतील लोकांनी मला एका कोपऱ्यामध्ये ढकले होते. टिकून राहण्यासाठी मला लोकांबरोबर बीफ खावं लागलं होतं, अशी तक्रार तिने सांगितली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)


बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या राजकारणाला वैतागून हॉलिवूडला गेल्याचा खुलासा तिने केली होती. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देसी गर्लने एका दिग्दर्शकाबरोबरचा धक्कादायक किस्सा तिने यावेळी सांगितला आहे. शूटिंगच्या दरम्यान संबंधित दिग्दर्शकाने देसी गर्लला अंडरगार्मेंट्स पाहण्याची मागणी केली होती. देसी गर्लने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ही घटना 2002-2003 मधली घडली आहे.

एका सिनेमात ती अंडरकव्हर गर्लची भूमिका साकारत होती. देसी गर्लने त्यावेळी इंडस्ट्रीत नवीन एन्ट्री केली होती, आणि ती अशा दिग्दर्शकाबरोबर काम करत होती. ज्यांना ती अगोदर भेटली सुद्धा नव्हती. अंडरकव्हर एजंटची भूमिका असल्याने एका मुलाला आपल्याकडे आकर्षिक करण्याचा तो सीन असल्याचा तिने यावेळी सांगितले. त्यासाठी मला कपडे काढायचे होते. त्यावेळी दिग्दर्शकांनी मागणी केली की, मला तिचे अंडरगार्मेंट्स पाहायचे आहेत.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

अन्यथा हा सिनेमा कोण पहायला येणार? असे देसी गर्ल त्यावेळेस विचारण्यात आले होते. देसी गर्लने अंडरगार्मेंट्स पाहण्याची मागणी दिग्दर्शकाने थेट तिच्याशी केली नव्हती. मात्र तिच्या स्टायलिस्टला त्याने तसे संकेत दिले होते. ही वागणूक अत्यंत अमानवीय असल्याचे देसी गर्लने यावेळी सांगितले. माझ्या कलेचं त्यांना महत्त्व नव्हतं, मी जे काम करत होती, त्याबद्दल त्यांना आदर नव्हता, असे स्पष्टीकरण यावेळी तिने दिली. दोन दिवस काम केल्यावर अखेर देसी गर्लने तो सिनेमा सोडायचा निर्णय घेतला होता. प्रॉडक्शन हाऊसला आपल्या खिशातून पैसे देऊन देसी गर्लने त्या प्रोजेक्टला रामराम केला होता.

Tags

follow us