राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले,
राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली आहे
काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला होता, त्यात त्यांना मोठी इजा झाली होती. तब्येतीपेक्षा मतदारसंघातील समस्या आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असल्यामुळे अधिवेशनाला आल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्याचा आरोप करत सरोज यांनी सुविधायुक्त कक्षाची मागणी केलीय. सुविधायुक्त कक्ष न मिळाल्याचं अधिवेशन सोडून जाणार असल्याचं आमदार सरोज अहिर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
विधानपरिषदेवर निवडणूक आल्यांनतर सत्यजित तांबे यांनी आमदार म्हणून पहिल्यांदा प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसासारख्या भावना असल्याचं ट्विट केलं आहे.