किर्गीस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर का झाला हल्ला? धक्कादायक माहिती आली समोर..

किर्गीस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर का झाला हल्ला? धक्कादायक माहिती आली समोर..

Kyrgyzstan Violence : किर्गीस्तानची राजधानी बिश्केकमध्ये स्थानिक लोकांनी केलेल्या (Kyrgyzstan Violence) मारहाणीत तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या लोकांनी पाकिस्तानी आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला टार्गेट केलं. येथे तोडफोड केली. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची गंभीर दखल भारत सरकारने घेतली असून विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. विद्यार्थ्यांनी सध्या घरातच थांबावे असे सरकारने म्हटले आहे. या घटनेनंतर किर्गीस्तानच्या यंत्रणांनी हल्लेखोरांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

किर्गीस सरकारने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सर्व सुरक्षित आहेत. भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांनी दूतवासाच्या संपर्कात रहावे आणि कोणतीही अडचण असेल तर तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

पाकिस्तानात लेटर पॉलिटिक्स! इम्रान खान सेनाप्रमुखांना धाडणार पत्र; सरकारचं वाढलं टेन्शन

दुसरीकडे पाकिस्तान सरकारनेही त्यांच्या विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेथील पोलिसांचे म्हणणे आहे की स्थानिक लोकांन भारतीय, पाकिस्तानी आणि बांग्लादेशी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला केला होता. हल्लेखोरांच्या जमावाला रोखण्यासाठी मोठ्या संख्येन सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली होती.

आता या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत हल्लेखोर विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीत तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेची दखल पाकिस्तान सरकारनेही घेतली आहे. ज्यांना माघारी देशात परतायचे असेल त्यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात येईल असे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.

हल्ल्याचं नेमकं कारण काय?

स्थानिक मीडियावर विश्वास ठेवला तर किर्गीस्तानी आणि विदेशी विद्यार्थ्यांत कोणत्या तरी किरकोळ कारणावरून धुमश्चक्री उडाली. या हाणामारीत किर्गीस्तानींच्या साथीला इजिप्तचेही काही विद्यार्थी होते. यानंतर पोलीस विदेशी विद्यार्थ्यांवर कारवाई करत नसल्याचे कारण पुढे करत किर्गीस्तानी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. परंतु, पोलिसांनी सांगितले की या घटनेनंतर तीन जणांना ताब्यात घेतले होते. हिंसक झालेल्या जमावाने पाकिस्तानी, भारतीय आणि बांग्लादेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीन दौऱ्यावर; ‘नो लिमिट्स’ बाबत मोठ्या घोषणांची शक्यता

किर्गीस्तानमध्ये भारतातील जवळपास १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील किती जण बिश्केकमध्ये राहतात याची निश्चित माहिती नाही. रशिया, बांग्लादेश, युक्रेनसह किर्गीस्तान देखील एमबीबीएस शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या देशाची पदवी जागतिक पातळीवर मान्य आहे. त्यामुळे अन्य देशांतील विद्यार्थी येथे मोठ्या संख्येने पदवी मिळवण्यासाठी येत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube