नवी दिल्ली : तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे (Turkey Earthquake) जोरदार धक्के जाणवले. नूरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 7.8 इतकी मोजली गेली. यादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. हा आकडा अजून वाढू शकतो. मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी ठेवली […]
भोपाळ : मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आणि कसा होणार? हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ठरवलं जाणार असल्याचं मोठं विधान माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केलंय. यादव यांच्या या विधानानंतर मध्यप्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद सुरु असल्याचं दिसून आलंय. कारण कमलनाथ यांना राज्याचा चेहरा मानून त्यांचा फोटो सध्या बॅनरवर झळकत आहे. […]
दुबई: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. दुबईतील (Dubai) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या (Pakistan) माध्यमांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुशर्रफ गंभीर आजाराने ग्रस्त होते. 10 जून 2022पासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना […]
लाहोर : पाकिस्तान (Pakistan) सध्या संकटातून जात आहे. पेशावरमधील मशिदीत नुकत्याच झालेल्या (Bombblast Peshawar) आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर, पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) वर लगाम घालण्यासाठी तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, शुक्रवारी पेशावरमध्ये सर्वोच्च समितीची बैठक झाली. यामध्ये टीटीपीला रोखण्यासाठी तालिबानचा मुख्य म्होरक्या हिबतुल्ला अखुंदजादा याचा हस्तक्षेप घेण्याचा […]
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील (Australia)चलनी नोटांबद्दल मोठा निर्णय (Queen Elizabeth)घेण्यात आलाय. येथील नोटांवरुन महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियामधील रिझर्व्ह बँकेच्या (Australian Reserve Bank) दिलेल्या माहितीनुसार नव्या पाच डॉलरवर आता स्वदेशी नक्षी असणारंय. त्यामुळं या नोटांवर असलेला राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II)यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गतवर्षी 2022 सप्टेंबर मध्ये राणी एलिझाबेथ […]
वॉशिंग्टन : एफबीआयनं (FBI)बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden)यांच्या डेलावेअरमधील बीच हाऊसची (Beach House)झाडाझडती घेतली आहे. यावेळी एफबीआयला कोणत्याही प्रकारची गोपनीय कागदपत्रं सापडली नाहीत. अध्यक्ष बायडन यांचे वैयक्तिक वकील बॉब बाऊर (Bob Baur) यांनी सांगितलं की, एफबीआयनं या प्रकरणात हस्तलिखित नोट घेतली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक वकिलाच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. […]