मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचा काल (23 ऑगस्ट) एका विमान अपघातात मृत्यू झाला. प्रिगोझिन यांच्यासोबत विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या असल्याचा दावा जगभरातून केला जात आहेत. […]
Wagner Group chief Yevgeny Prigozhin Dead : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) ठार झाले आहेत. प्रिगोझिन हे प्रवास करत असलेले विमान कोसळून अपघात झाला आहे. यात प्रिगोझिनसह विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त जगभरातील माध्यम संस्थांनी दिले आहे. Chandrayaan-3 च्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा […]
Thaksin Shinawatra: थायलंडच्या (Thailand) सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांना आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. परदेशात अनेक वर्षे निर्वासित राहिल्यानंतर थाक्सिन शिनावात्रा आज मायदेशी परतले. थाक्सिन शिनावात्रा आज सकाळी बँकॉकच्या (Bangkok) आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या कुटुंबासह खाजगी जेटने पोहोचले होते. त्यानंतर काही वेळ माध्यमांशी संवाद साधला तसेच आपल्या समर्थकांची भेट घेतली. सर्वोच्च […]
टोकियो : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून, टोकीयो विमानतळावर मराठी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने फडणवीस भारावले आणि त्यांनी जपानमध्ये येऊनही आपल्याला मुंबई-पुण्याचा फील येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात फडणवीस जपानमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. शिंकमसेन बुलेट ट्रेवमधून लुटला प्रवासाचा आनंद जपानमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी शिंकमसेन या […]
Luna 25 : भारतानंतर चंद्रमोहिम आखत चंद्राच्या दिशेने वेगात निघालेले रशियाचे लूना 25 (Luna 25) क्रॅश झाले आहे. या घटनेनंतर रशियाच्या मून मिशनला (Moon Mission) मोठा झटका बसला आहे. लूना 25 चंद्राच्या मार्गावरून भरकटल्याच्या बातम्या येतच होत्या. त्यानंतर मात्र आता यान क्रॅश झाल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. जर्मनीच्या डीडब्ल्यू न्यूजने अंतरिक्ष संस्था रोस्कोस्मोसच्या हवाल्यने […]
Pakistan : पाकिस्तानातून महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये भीषण अपघात घडला असून या अपघातात बसला आग लागली. या आगीत तब्बल 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटन पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. ही बस कराचीवरून निघाली होती. बसमध्ये 30 ते 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. या […]