दररोज नाक कापून घेणाऱ्या पाकचं भारताविरुद्ध बुनयान उल मरसूस ऑपरेशन ! काय आहे अर्थ ?

pak Operation Bunyan Un Marsoos Against india : जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यात 27 हून अधिक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पत्नी, मुलांच्यासमोर पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेकडून हा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले आहे. त्यात पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानमध्ये घुसून हे ऑपरेशन राबविण्यात आले. विमान आणि मिसाइलचा वापरून नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. मोहिमेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा सहभाग. सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, भारतीय सैन्य दलाकडून प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाच दिवसाने दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्ध एक ऑपरेशन राबविण्यात सुरुवात केली आहे. त्याला ‘बुनयान उल मरसूस’ (Operation Bunyan Un Marsoos) असे नाव दिलंय. याचा अर्थ काय होतो, हे ऑपरेशन सुरुवातीला भारताने अपयशी कसे ठरविले आपण पाहुया….
India-Pak War : पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या IMF कडे इतके पैसे कुठून येतात?
पाकिस्तानने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनयान उल मरसूस राबविण्यास सुरुवात केली आहे. बुनयान उल मरसूस हे नाव कुरणातील एका आयतीवरून म्हणजेच वचनातून घेतले आहे. हा एक अरबी शब्द आहे. त्याला वेगवेगळे अर्थ आहे. त्याला मजबूत भिंत किंवा अतूट भिंत असे म्हटले जाते. हा शब्द राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सैन्याची एकदा, ताकद, शिस्तीचा संदेश देतो, यासाठी पाक लष्कराने भारताविरुद्धच्या ऑपरेशनला बुनयान उल मरसूस असे नाव दिले आहे. त्यानुसार भारताच्या पठाणकोट, उधमपूर, श्रीनगर येथील लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा पाक लष्कराने केलाय. पाकच्या या ऑपरेशनला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाककडून 26 ठिकाणहून हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला.
मोठी बातमी! भारतीय सैन्यदलाकडून जोरदार पलटवार; २८ दहशतवाद्यांचा केला खात्मा
पाककडून उधमपूर, भूज, भटिंडा, पठाणकोट, श्रीनगर येथे हवाई हल्ले केले. लष्करी परिसर व नागरी भागांमध्ये हे हल्ले केल्याचे भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्या बदल्यात भारताने प्रत्युतर देत पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले केले. या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटने हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळ उद्ध्वस्त केलेत.
पाकचे खोटे दावे
‘बुनयान उल मरसूस’ ऑपरेशननुसार भारताचे लष्करी तळ, रडार सिस्टिमचे नुकसान केल्याचे दावे पाककडून करण्यात येत आहे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे भारतीय लष्कराकडून जाहीर करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचे S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमची ब्रह्मोसचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित असून, पाकिस्तानकडून करण्यात येत असलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान केले आहे. पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत असून, सिरसा, आदमपूर हवाई तळांना झालेल्या नुकसानीचे दावे पूर्णपणे खोटो आहे, असे परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच हवाई तळांचे फोटो जारी केले आहेत.
गेल्या चार दिवसांत भारताने पाकिस्तानची प्रत्येक चाल ही हाणून पाडली आहे. भारताकडील सैन्यदल, तोफखाना, हवाई, नौदलाची ताकदीपुढे पाकच्या कुठलाही निभाव लागू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या ऑपरेशनही भारत हवाई तळांसारखेच उद्द्धस्त करून लावेल.