Pakistan News : पाकिस्तानात भारताचा आणखी एक शत्रू ठार; 26/11 तील सूत्रधाराचा खात्मा

Pakistan News : पाकिस्तानात भारताचा आणखी एक शत्रू ठार; 26/11 तील सूत्रधाराचा खात्मा

Pakistan Lashkar Terrorist Dies : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये दहशतवाद्यांना (Pakistan News) ठार मारले जात आहे. यातील बहुतांश अतिरेकी भारताचे शत्रू आहेत. या दहशतवाद्यांना मारले जात असले तरी यामागे कारण काय याचा खुलासा झालेला नाही. आताही अशीच एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील फैसलाबाद शहरात लष्कराचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचा मृत्यू झाला आहे. चीमा हा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै 2006 च्या मुंबईच रेल्वे बॉम्बस्फोट तसेच भारतातील अन्य ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता.

चीमा हा लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. पाकिस्तानात त्याचा मुक्त वावर होता. तो अनेकदा कराची, लाहोर या शहरांत प्रशिक्षण शिबिरात जात असायचा अशीही माहिती आता समोर आली आहे. भारताचा नकाशा वाचण्यात तो पटाईत होता. भारतातील महत्वाची ठिकाणे शोधण्यास त्याने अन्य दहशतवाद्यांना शिकवले.

Pakistan News : पाकिस्तानात मोठी घडामोड; माजी पंतप्रधानाची मुलगी पहिली महिला CM

चीमाकडे अफगाण युद्धाचा अनुभव होता. त्याने 2008 मध्ये पाकिस्तानातील बहावलपूरसाठी लष्कर कमांडर म्हणून काम केले होते. याच दरम्यान त्याला लष्कर ए तैय्यबा संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या सल्लागारपदी नियुक्ती मिळाली होती. तो ओसामा बिन लादेनच्या अल कायदा नेटवर्कशी देखील जोडला गेला होता.

दरम्यान, याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शाहिद हा अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. या दहशतवाद्याने पठाणकोट हल्यात समन्वयाची भूमिका बजावली होती. त्याचीच आता पाकिस्तानात हत्या करण्यात आली. शाहिद हा भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत होता. पाकिस्तानातील सियालकोट परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या, असे सांगण्यात येत आहे. शाहिद 41 वर्षांचा होता. त्याने 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट येथील हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानेच या हल्ल्याचे समन्वय केले होते.

Pakistan : पाकिस्तान हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या

भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे. नुकतीच या यादीत दोन नवीन नावं जोडली गेली होती. त्यापैकी एक शाहिद लतीफ होता, तो पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ आहे, याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनीच गोळी घालून ठार केले. त्यानंतर आझम चीमाच्या रुपाने आणखी एक भारतविरोधी दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube