आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती आज निश्चित झाल्या.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक माघार घेतली.
कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज मनसेने अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते पराभूत झाले आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत.