पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली…, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा जामीन फेटाळताच राऊतांचा भाजप शिंदेवर वार

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 26T125245.118

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना राडा झाला आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. हे प्रकरण चंगलंच तापलं आहे. विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजप सरकार जोरदार प्रहार केला आहे.

कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल विचारत राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. भाजपसोबत असलेल्या आघाडीतील लोकं हे भाजपचा पराभव करण्यास इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं असंही ते म्हणालेत.

रणसंग्राम महापालिकांचा! निवडणूक लढवायची सर्वांनाच; जागा वाटपाचा तिढा सुटेना, वाचा खास स्टोरी

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एका काँग्रेसच्या कार्यकर्त्या ला ठार मारण्यासाठी ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला केला आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टाने गागोवले यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्री, मंत्र्यांची मुलं, त्यांचे भाऊ यांनी खून केले, दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री फडणवीस आणि राज्याच्या महासंचालकांनी अभय दिलं आहे का ? तो (गोगावले) फरार आहे, आणि पोलिसांना सापडत नाही, त्याचा अटकपूर्वी जामीन फेटाळला जातो,तरीही तो सापडत नाही असंही ते म्हणाले.

राज्याचा एक मंत्री (कोकाटे) बेपत्ता होतो आणि 48 तास सापडत नाही. पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. कुठे गेला मंत्र्यांचा (गोगावले) मुलगा ? कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल राऊतांनी सरकारला विचारला आहे.

follow us