‘विरार का छोरा’ उत्तर पश्चिम मुंबईच्या रणांगणात; कीर्तीकरांच्या मुलाला देणार टफ

  • Written By: Published:
‘विरार का छोरा’ उत्तर पश्चिम मुंबईच्या रणांगणात; कीर्तीकरांच्या मुलाला देणार टफ

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर आता अनेक पक्षांचं घोडं अडलं आहे ते म्हणजे जागा वाटपावरून. काही जागांवरून अद्याप महायुतीत एकमत न झाल्याने जागा वाटपांचं भिजत घोंगडं कायम आहे. हा तिढा सोडवण्यात अद्याप यश मिळालेलं नसतानाच उत्तर पश्चिम मुंबईत एकनाथ शिंदेंकडून वेगळीचं चाचपणी सुरू असल्याची चर्चा असून, ‘विरार का छोरा’ ठाकरे गटाचा उमेदवाराला लोकसभेच्या रणांगणात जोरदार टफ देणार असल्याचे चर्चा रंगू लागली आहे. (Actor Govinda Likely To Comeback In Politics)

लोकसभेसाठी उत्तर पश्चिम मुंबईतील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर खासदार आहे. पण यावेळी या जागेवर कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता कीर्तीकरांच्या मुलाला तगडी फाईट देण्सासाठी शिंदेंनी पडद्यामागे हालचाली करण्यास सुरूवात केली असून, अमोल कीर्तीकरांना टफ देण्यासाठी राजकीय संन्यास घेणाऱ्या अभिनेता गोविंदाच्या नावाची चाचपणी शिंदेंकडून केली जात आहे. यासाठी शिंदेंनी गोविंदाची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर खासदार

2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अभिनेते गोविंदा यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या राम नाईक यांचा पाच टर्म राखलेला गड पाडला होता. येथून गोविदाने जवळपास 50 हजारांचं मताधिक्य मिळवत गोविंदाने राम नाईकांचा पराभव केला होता. नाईकांना 5 लाख 11 हजार 492, तर गोविंदाला 5 लाख 59 हजार 763 मतं मिळाली होती.

राजकारणात येऊन वेळेचा अपव्यय झाला

2004 मध्ये काँग्रेसने गोविंदाला तिकीट देत खासदार केले होते. मात्र, त्यानंतर मतदारसंघातील जनतेनं अडचणी सोडवण्यासाठी गोविंदाशी संपर्क होत नसल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. एवढेच नव्हे तर, खासदार होऊनही गोविंदा संसदेत उपस्थित राहत नव्हता. त्याच्या या गैरहजेरीची जोरदार चर्चादेखील झाली होती. याच काळात म्हणजे साधारण 2007 मध्ये गोविंदाचा ‘पार्टनर’ चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर त्याने राजकारणातून संन्यास घेण्याचे जाहीर केले.

मात्र, संन्यास घेताना गोविंदाने आपण राजकारणात येऊन वेळेचा अपव्यय केल्याचं खापरं फोडलं. तसेच यामुळे चित्रपटांवरही याचा विपरित परिणाम झाल्याचे विधान केले होते. परंतु, आता हाच विरार का छोरा म्हणजेच गोविंदा पुन्हा राजकारणात सेकंड इनिंग खेळण्यास पुन्हा एकदा तयार झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube