धक्कातंत्राची परिसीमा! भाषणावर प्रभावित झाले, टेबल बडवले त्याच खासदाराला मोदी-शाहंनी घरी बसवले

  • Written By: Published:
धक्कातंत्राची परिसीमा! भाषणावर प्रभावित झाले, टेबल बडवले त्याच खासदाराला मोदी-शाहंनी घरी बसवले

नवी दिल्ली : लोकसभा निडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं कलम 370 (Article 370) आणि राम मंदिराचा मुद्दा कळीचा बनवला आहे. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर दमदार भाषण ठोकलेल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत मोदी-शाहंनी (Narendra Modi) घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपकडून आज (दि.23) लडाखसाठी उमेदवार जाहीर केली. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर जोरदार भाषण करणाऱ्या लडाखचे विद्यमान खासदार जम्यांग सेरिंग नामग्याल यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी ताशी ग्लायसन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   (BJP Drops Ladakh MP Namgyal, Names Local Council Chief Tashi Gyalson As Candidate)

Article 370 Verdict : कलम 370 वैध ठरवणारे न्यायमूर्ती आहेत तरी कोण?

जम्यांग सेरिंग नामग्याल 2019 मध्ये पहिल्यांदा लडाखमधून संसदेत निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान दमदार भाषण ठोकले होते. त्यांचे हे भाषण ऐकल्यानंर खुद्द गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांचे चाहते झाले होते. एवढेच नव्हे तर, भाषणानंतर मोदी-शाहंनी सभागृहात नामग्याल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी टेबलही बडवले होते. मात्र, आता त्यांचेच तिकीट कापण्यात आल्याने भाजपने लोकसभेसाठी धक्कातंत्राची परिसीमा गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नामग्याल मोदी-शहांचे कट्टर समर्थक

नामग्याल हे भाजपच्या स्टार खासदारांपैकी एक आहेत. कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान त्यांनी दिलेल्या भाषणाने विरोधकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांच्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा चांगलेच प्रभावित झाले होते. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या पाठीवर थाप दिली होती.

लडाखमधील जनतेवर कायम अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करत कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना नामग्याल यांनी गप्प केलं होते. जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारांनी लडाखमधील नागरिकांना नोकरी देताना नेहमीच पक्षपात केला. काँग्रेसने कलम 370 चा गैरवापर करत लडाखमधून बौद्ध संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नामग्लाल यांनी केला होता.

कॉंग्रेसने कलम 370 हे 70 वर्षे आपल्या मुलासारखं सांभाळलं; अमित शाहांची टीका

मोदी सरकारमुळे सुरू झालं पहिलं विश्वविद्यापीठ

कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान नामग्याल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. यात त्यांनी कलम 370 चा चुकीचा वापर करत काश्मीरी पंडितांना बाहेर काढण्यात आलं. आतापर्यंत लडाखमध्ये एकही उच्च शिक्षण संस्था नव्हती. मोदी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा इथे विश्वविद्यापीठ सुरु झाल्याचे म्हणत केंद्र सरकारची पाठ थोपटली होती.

ताशी ग्याल्सन कोण आहे?

ताशी ग्याल्सन व्यवसायाने वकील आहेत. कालांतरीने ते राजकारणाकडे वळले. सध्या त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पद असून. ते लेहमधील लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे सध्या ते अध्यक्ष/CEC  आहेत. ताशी ग्याल्सन यंदाच्या लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube