PM मोदी आज विदर्भात, चंद्रपूरमधून मुनगंटीवारांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार

PM मोदी आज विदर्भात, चंद्रपूरमधून मुनगंटीवारांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार

PM Narendra Modi In Chandrapur : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवा (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे.

अवकाळी पावसाचं संकट कायम! विदर्भ, मराठवाड्यात पावसाची इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट 

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी मोदींची चंद्रपुरात सभा होत आहेत. मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे.

Madhuri Pawar : ‘रानबाजार’ फेम माधुरी पवारचा ब्लॅक साडीतील लूक

तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आज विदर्भात सभा घेणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट येथे भाजपचे उमेदवार व खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ते सभा घेत असल्याचे वृत्त आहे. सायंकाळी योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपुरात सभा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. येथे प्रथमच मंत्री आणि आमदार यांच्यात लढत होत असून महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज